Home /News /maharashtra /

ट्रेनमध्ये तुफान राडा, 12 जणांनी केलेल्या मारहाणीत बायको आणि अडीच वर्षीय मुलीसमोरच तरूणाचा मृत्यू

ट्रेनमध्ये तुफान राडा, 12 जणांनी केलेल्या मारहाणीत बायको आणि अडीच वर्षीय मुलीसमोरच तरूणाचा मृत्यू

मारहाणीमुळे एक्स्प्रेसमधील प्रवाशांमध्ये चांगलीच खळबळ उडाल्याचं पाहायला मिळालं.

    सुमित सोनवणे, दौंड, 13 फेब्रुवारी : मुंबई-लातूर बिदर एक्सप्रेसमध्ये (mumbai latur bidar express) सहा महिला आणि सहा पुरुषांच्या टोळक्याने कल्याणमधील कुटुंबाला बेदम मारहाण केली. या मारहाणीत 26 वर्षीय तरुणाचा रेल्वेच्या डब्यातच मृत्यू झाला आहे. या मारहाणीमुळे एक्स्प्रेसमधील प्रवाशांमध्ये चांगलीच खळबळ उडाल्याचं पाहायला मिळालं. मुबई- लातूर बिदर एक्सप्रेस मध्ये एका तरुणाला त्याच्या अडीच वर्षांच्या मुलगी आणि बायकोसमोरच मारहाण करण्यात आली. यामध्ये त्या तरुणाचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना मुंबई-लातूर बिदर एक्सप्रेस मध्ये घडली आहे. सागर जनार्धन मारकड (वय 26 वर्ष)असं मारहाणीत मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे. संबंधित तरुण हा त्याची बायको, लहान मुलगी आणि आईसोबत नातेवाईकाचे निधन झाल्याने अंत्यविधीसाठी उपळाई (तालुका माढा, जिल्हा सोलापूर) येथे जाण्यासाठी रेल्वेने प्रवास करत होते. पुणे रेल्वे स्टेशन येथील प्लॅटफॉर्म नंबर सहावरून मुंबई-लातूर- बिदर एक्सप्रेस गाडीच्या इंजिनचे जनरल डब्यातून पुणे ते कुर्डवाडी असे प्रवासाला निघाले असता बसण्यास जागा नसल्याने सागर मारकड आणि त्याच्या सर्व कुटूंब उभे होते. गाडी पुणे रेल्वे स्टेशनपासून सुटताच पती सागर यांनी दरवाजा लगत असलेल्या सीटवरील एका महिलेस म्हणाले की, माझ्या पत्नीजवळ लहान मुलगी आहे. बसण्यासाठी थोडी जागा द्या. तेव्हा त्या महिलेने पती सागर यांना शिवीगाळ केली. तेव्हा सागर यांनी त्या महिलेस शिवीगाळ करू नका, असे म्हणत असल्यावर तिथे असलेल्या एका गटातील महिलांनी सागर यांना आणखीन शिवीगाळ करून धक्काबुक्की करू लागले. त्या महिलेसोबत असलेले सहा पुरुष आणि सहा महिला यांनीदेखील सागरसह कुटुंबियांना हाताने आणि काठीने मारले. पुण्यातील धक्कादायक प्रकार समोर, 25 वर्षीय तरुणीवर नवऱ्याच्याच संमतीने बलात्कार त्यावेळी सागरच्या पत्नीने आणि आईने त्यांना सोडवण्याचा प्रयत्न केला. तरीदेखील ते सागर यांना काठीने मारत होते. यादरम्यान सागर हा मारहाणीमुळे डब्यातच खाली पडला. सागरला उठवण्याचा प्रयत्न त्यांच्या बायकोने आणि आईने केला पण त्याचा जागीच मृत्यू झाला होता. त्यानंतर सागरच्या पत्नीने रेल्वेमधील 3 वेळा चौन देखील ओढली. गाडी थांबून पुन्हा सुरू झाली. परंतु कोणीही मदतीसाठी आले नाही. गाडीतील एका प्रवाशाने फोनद्वारे पोलिसांना कळवले. मुंबई-लातूर बिदर एक्सप्रेस गाडी दौंड रेल्वे स्टेशन येथे पहाटे दोन वाजता सुमारास आली, तेव्हा दौंड लोहमार्ग पोलीस ठाण्यातील पोलीस आले आणि त्यांनी आरोपींना ताब्यात घेतले. दरम्यान, पुढील तपास पोलीस निरीक्षक दीपाली भुजबळ यांनी पुणे लोहमार्ग पोलीस यांच्याकडे वर्ग केला आहे.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    पुढील बातम्या