मुंबई, 3 जून : महात्मा गांधी यांच्यासंदर्भात वादग्रस्त विधान केल्यानं महिला आयएएस अधिकारी निधी चौधरी यांच्यावर चौफेर टीका होते आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही याविरोधात कारवाईची मागणी केली आहे. शरद पवारांनी यांसदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रदेखील लिहिलं. 'मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राचे प्रमुख म्हणून या अधिकाऱ्यावर कडक कारवाई करावी', अशी मागणी पवार यांनी केली आहे. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात शासकीय अधिकार्याकडून असा प्रमाद घडावा व शासनाने त्याकडे काणाडोळा करावा हे अशोभनीय आहे, असं म्हणत पवारांनी सरकारवरही ताशेरे ओढले आहेत.
या विधानात महात्मा गांधींच्या मारेकऱ्याचे उदात्तीकरणही करण्यात आले आहे. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात शासकीय अधिकार्याकडून असा प्रमाद घडावा व शासनाने त्याकडे काणाडोळा करावा हे अशोभनीय आहे.
बृहन्मुंबई म.न.पा मधी उपायुक्तपदी कार्यरत असणाऱ्या भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या 150व्या जयंती वर्षानिमित्तानं भारतीय चलनात असणाऱ्या नोटांवरील या महामानवाचे छायाचित्र काढून टाकावे व जगभरातून त्यांचे पुतळे हटवून त्यांना श्रद्धांजली द्यावी, असे धक्कादायक विधान सोशल मीडियावर केल्याचं समजले. एवढेच नव्हे तर महात्मा गांधीजींच्या मारेकऱ्यांचे देखील त्यांनी उदात्तीकरण केले आहे.
शासकीय सेवेतील एका जबाबदार वरिष्ठ अधिकाऱ्यानं अशी लांछनास्पद जाहीर भूमिका घेणे हे केवळ निषेधार्ह नाही तर असे कृत्य सक्त कारवाईस पात्र आहे. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात महापुरुषांच्या बाबतीत शासन दरबारी असणाऱ्या व्यक्तींकडून असा गंभीर प्रमाद घडावा आणि त्याकडे राज्य शासनाने कानडोळा करावा, ही दुर्दैवी व अशोभनीय बाब आहे.
महोदय, राज्याचे प्रमुख म्हणून आपण अशा अधिकाऱ्यावर कडक कारवाई करावी, जेणेकरून पुन्हा असा प्रकार घडणार नाही. कारवाई न केल्यास राज्य सरकारची थोर पुरुषांच्या बाबतीतील निती आणि नियम अतिशय खालच्या स्तरावर पोहोचली असा समज होईल.
हे पत्र पोहोचताच सदर अधिकाऱ्यावर उदाहरणीय कारवाई होईल, अशी अपेक्षा व्यक्त करतो. - शरद पवार
I have deleted my tweet of 17.05.2019 w.r.t. GandhiJi because some people misunderstood it
If only they had followed my timeline since 2011 they would've understood that I would NEVER even dream of insulting GandhiJi
— Nidhi Choudhari🕉☪️✝️☸️ (@nidhichoudhari) May 31, 2019
निधी चौधरी यांनी 17 मे रोजी केलं होतं वादग्रस्त ट्विट
महात्मा गांधींविषयी ट्वीट करताना निधी चौधरी यांनी महात्मा गांधींचे मारेकरी नथुराम गोडसे यांना धन्यवाद दिले होते. "महात्मा गांधी यांची 150 वी जयंती उत्साहात साजरी केली जात आहे. मात्र ज्या रस्ते, संस्थांना गांधींचे नाव दिले गेले आहे, ते काढण्याची वेळ आता आली आहे. जगभरातील त्यांचे पुतळे हटवण्यात यावेत तसेच नोटांवरूनही त्यांचा फोटो काढण्यात यावा. हीच आपल्या सर्वांकडून महात्मा गांधींना खरी श्रद्धांजली ठरेल. 30-1-1948 साठी थँक यू गोडसे", असे वादग्रस्त ट्विट त्यांनी केलं होतं.