मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /शर्लिन प्रकरणात अभिनेत्री राखी सावंतला हायकोर्टानं दिलेला दिलासा कायम; काय आहे कारण?

शर्लिन प्रकरणात अभिनेत्री राखी सावंतला हायकोर्टानं दिलेला दिलासा कायम; काय आहे कारण?

FILE PHOTO

FILE PHOTO

एका मॉडेलचा फोटो व्हायरल केल्याचा आरोप राखी सावंतवर करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तक्रारीची दखल घेत राखीवर कारवाई केली.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 3 फेब्रुवारी : एका मॉडेलचा फोटो व्हायरल केल्याचा आरोप राखी सावंतवर करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तक्रारीची दखल घेत राखीवर कारवाई केली. राखीवर आरोप करणाऱ्या अभिनेत्री-मॉडेल शर्लिन चोप्राचा व्हिडीओ देखील समोर आला होता. याप्रकणी अभिनेत्री राखी सावंतला हायकोर्टानं दिलेला दिलासा कायम ठेवला आहे.

कोर्टात काय घडलं - 

राखी सावंतच्या वकिलांनी कोर्टाला विनंती विनंती केली की, राखी सावंत यांच्या आई नुकत्याच वारल्या आहेत म्हणून त्यांन पुढील तारखेपर्यंत दिलासा देण्यात यावा. यावर सरकारी पक्षानं सहमती दर्शवली. त्यामुळे कोणतीही कठोर कारवाई न करण्याची कोर्टानं दिलेली मुभा 8 फेब्रुवारी पर्यंत कायम ठेवण्यात आली आहे. मुंबई हायकोर्टात सुनावणी दरम्यान,आज या प्रकरणातील तपास अधिकारी कोर्टात गैरहजर होते. त्यामुळे कोर्टानं 8 फेब्रुवारी पर्यंत सुनावणी तहकुब केली आहे. अभिनेत्री राखी सावंतला हायकोर्टानं दिलेला दिलासा कायम राहिला आहे.

आजदेखील मूळ तक्रारदार शर्लिन चोप्राने मुंबई हायकोर्टात हजेरी लावली. शर्लिननं,राखीच्या अटकपूर्व जामिनाला विरोध केला आहे. तसेच शर्लिनच्या तक्रारीवरूनच आंबोली पोलीस ठाण्यात राखी सावंत विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एका मॉडेलचा फोटो व्हायरल केल्याचा आरोप राखी सावंतवर करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तक्रारीची दखल घेत राखीवर कारवाई केली. राखीवर आरोप करणाऱ्या अभिनेत्री-मॉडेल शर्लिन चोप्राचा व्हिडीओ देखील समोर आला होता. तिने राखीवर गंभीर आरोप केले होते. शर्लिन चोप्रा हिनेच ट्विटरद्वारे राखी सावंतला अटक झाली असल्याची माहिती दिली.

हेही वाचा - Rakhi Sawant: राखीवर गंभीर आरोप करणारी शर्लिन चोप्रा नक्की आहे तरी कोण; 'हे' वाचून बसेल धक्का

कोण आहे शर्लिन चोप्रा -

शर्लिन चोप्रा ही एक भारतीय अभिनेत्री आणि मॉडेल आहे जिने हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. शर्लिन चोप्रा प्लेबॉय मासिकासाठी न्यूड पोज देणारी पहिली भारतीय महिला आहे. फोटो दोन वर्षांनी प्रसिद्ध झाले. त्यानंतर MTV Splitsvilla या शोच्या सहाव्या सीझनच्या होस्टसाठी तिची निवड झाली. डिसेंबर 2013 मध्ये, तिने "बॅड गर्ल" नावाचा म्युझिक व्हिडीओ रिलीज केला. 2009 मध्ये बिग बॉस या रिअॅलिटी शोमध्ये ती स्पर्धक होती. तसेच 2013 मध्ये तिने रूपेश पॉल दिग्दर्शित कामसूत्र 3D मध्ये मुख्य नायिका म्हणून काम केले आहे.

First published:

Tags: Bollywood, Bollywood actress, Bollywood News, Entertainment, Rakhi sawant