मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /देखावा म्हणजे अपमान करण्याचं स्थान नाही; 'त्या' मंडळाला खडसावत काही अटींसह कोर्टाने दिली परवानगी

देखावा म्हणजे अपमान करण्याचं स्थान नाही; 'त्या' मंडळाला खडसावत काही अटींसह कोर्टाने दिली परवानगी

देखाव्यातील काही आक्षेपार्ह शब्द आणी चित्र वगळण्याची अट न्यायालयाने ठेवली आहे. त

देखाव्यातील काही आक्षेपार्ह शब्द आणी चित्र वगळण्याची अट न्यायालयाने ठेवली आहे. त

देखाव्यातील काही आक्षेपार्ह शब्द आणी चित्र वगळण्याची अट न्यायालयाने ठेवली आहे. त

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 2 सप्टेंबर : संपूर्ण राज्यात गणेशोत्सवाचा उत्साह आहे. त्यातच कल्याण मधील एका गणेश मंडळाने सादर केलेला देखावा वादग्रस्त असल्याने 31 ऑगस्टला पोलिसांनी पहाटे तीन वाजताच्या सुमारास तेथे धाव घेत पक्षनिष्ठा हा देखावा जप्त करण्याची कारवाई केली होती. कल्याणमधील विजय तरुण मंडळाचा हा देखावा होता. पोलिसांनी केलेल्या या कारवाईनंतर न्यायालयाने पोलिसांना फटकारले आहेत. तसेच न्यायालयाने विजय तरुण मंडळाला देखाव्यासाठी खडसावत काही अटींसह परवानगी दिली आहे.

न्यायालयाने काय म्हटले -

देखाव्यातील काही आक्षेपार्ह शब्द आणी चित्र वगळण्याची अट न्यायालयाने ठेवली आहे. तसेच बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचे देखाव्यात फोटो लावण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. या फोटोंवर आक्षेप घेणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना न्यायालयाने जाब विचार आले. हे फोटो लावल्यानं, कोणता गुन्हा होतो? असा सवालही न्यायलायने विचारला. मात्र, अमित शहा यांच्यासारख्या दिसणारा एका व्यक्तीचं चित्र, देखाव्यात न लावण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. देखावा म्हणजे संदेश देण्यासाठी स्थान आहे. व्यक्तींचा अपमान करणारं स्थान नाही, असे खडे बोलही न्यायालयाने सुनावले आहे.

कल्याण येथील आक्षेपार्ह देखावा प्रकरणी न्यायालयात सुनावणी झाली. कल्याणमधील विजय तरुण मंडळाचा देखावा आक्षेपार्ह ठरवून पोलिसांनी तो काढला होता. तसेच मंडळाचे अध्यक्ष विजय साळवी ऊर्फ बंड्या यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करत कारवाई केली होती. याविरोधात, शिवसैनिकांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायमूर्ती श्रीमती मोहिते ढेरे यांच्या चेंबरमध्ये ही सुनावणी झाली. यावेळी अतिरिक्त पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक वनमाणे यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा - गणेशोत्सवाचा देखावा जप्त करण्यासाठी पहाटे तीन वाजता पोलिसांची धाड, कल्याणमधील प्रकरण काय?

गुन्हा दाखल करणे म्हणजे हिटलरशाही -

दरम्यान, पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर विजय साळवी यांनी सांगितले होते की, मंडळाने नेहमीच ताज्या विषयावर देखावे साकारले आहे. त्यामुळे यावर्षी पक्षातील फुट हा विषय घेण्यात आला होता. मात्र, पोलिसांनी देखावा जप्त केला आहे. तसेच मंडळाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही एक प्रकारे हिटलर शाही आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती.

First published:

Tags: Ganesh chaturthi, Kalyan, Mumbai high court