मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

नवनीत राणांचं जातप्रमाणपत्र खोटं, अमरावतीत शिवसैनिकांचा एकच जल्लोष

नवनीत राणांचं जातप्रमाणपत्र खोटं, अमरावतीत शिवसैनिकांचा एकच जल्लोष

मुंबई उच्च न्यायालयाच्या (Mumbai High court) नागपूर खंडपीठानं अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांची जात वैधता प्रमाणपत्र (Cast validity Certificate) रद्द केलं आहे. तसेच त्यांना 2 लाखांचा दंडही सुनावला आहे.

अमरावती, 08 जून: मुंबई उच्च न्यायालयाच्या (Mumbai High court) नागपूर खंडपीठानं अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांची जात वैधता प्रमाणपत्र (Cast validity Certificate) रद्द केलं आहे. त्याचबरोबर निवडणुकीच्या शपथपत्रात बोगस जात प्रमाणपत्र (cast certificate) जोडल्याबद्दल दोन लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. परिणामी नवनीत राणा यांच्या अडचणी वाढल्या असून त्यांची खासदारकी धोक्यात आली आहे. उच्च न्यायालयाच्या निकालानंतर शिवसेनेनं (Shivsena) अमरावती शहरातील राजकमल चौकात प्रचंड जल्लोष केला आहे. यावेळी सेनेच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत आनंद साजरा केला आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ (Anandrao Adsool) आणि सुनील भालेराव (Sunil Bhalerao) यांनी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या निवडणुकीला आव्हान देणाऱ्या याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केल्या होत्या. नवनीत राणा यांनी निवडणूक अर्जासोबत शपथपत्रात अनुसूचित जमातीबाबत दिलेलं प्रमाणपत्र बोगस असल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.

त्याचबरोबर, खासदार राणा यांनी जात प्रमाणपत्र समितीसमोरदेखील त्यांच्या जातीचा खोटा दावा केला आहे, असा आरोपही याचिकाकर्त्यांनी याचिकेत केला होता. त्यामुळे मागील काही दिवसांपासून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात यावर सुनावणी घेतली जात होती. याबाबतचा निकाल न्यायालयाने नुकताच दिला आहे. हा निकाल शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि सुनील भालेराव यांच्या बाजूने लागल्याने अमरावती शहरात शिवसेनेच्या वतीने मोठा जल्लोष साजरा करण्यात आला आहे.

हे ही वाचा-तिसऱ्या लाटेविरोधात लढण्यासाठी मुंबई महापालिका सज्ज : सुरेश काकाणी

दुसरीकडे, अमरावतीच्या विद्यमान खासदार नवनीत राणा यांच्या अडचणी मात्र वाढताना दिसत आहे. बोगस जात प्रमाणपत्र दिल्याने राणा यांची खासदारकी धोक्यात आली आहे.  जातप्रमाण पत्र रद्द झाल्यानंतर 'मी अद्याप न्यायालयाचे आदेश वाचलेले नाहीत', अशी पहिली प्रतिक्रिया खासदार नवनीत राणा यांच्याकडून देण्यात आली आहे.

First published:

Tags: Amravati, Maharashtra, Navneet Rana