Home /News /maharashtra /

आज आणि उद्या मुंबईत जोरदार पाऊस, हवामान खात्याचा इशारा

आज आणि उद्या मुंबईत जोरदार पाऊस, हवामान खात्याचा इशारा

राज्यात सर्वत्र मान्सूनने जोर धरलाय, दक्षिण-महाराष्ट्रासह मुंबई-उपनगरात जोरदार पाऊस सुरू आहे. काही ठिकाणी रेल्वेट्रॅकवर पाणी साचल्याने रेल्वेसेवा विस्कळीत झालीय.

    07 जुलै : राज्यात सर्वत्र मान्सूनने जोर धरलाय, दक्षिण-महाराष्ट्रासह मुंबई-उपनगरात जोरदार पाऊस सुरू आहे. काही ठिकाणी रेल्वेट्रॅकवर पाणी साचल्याने रेल्वेसेवा विस्कळीत झालीय. आज आणि उद्या मुंबई आणि उपनगरात जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिलाय. नवी मुंबईत ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस काल मध्यरात्रीपासून सुरू आहे.आज सकाळी 11 वाजल्यापासून पावसाचा आणखीनच जोर वाढलाय. शहरात काही ठिकाणी झाडे उन्मळून पडलेत, तर शहरात दोन ठिकाणी पाणी तुंबलंय. हार्बर आणि ट्रान्स हार्बर 15 ते 20 मिनिटे उशिराने धावताहेत. 1. विठ्ठलवाडी आणि कल्याण दरम्यान रेल्वेरूळावर पाणी साचल्यानं बदलापूर कल्याण रेल्वेसेवा ठप्प 2. दक्षिण महाराष्ट्रातल्या कोल्हापूर जिल्ह्यातही पावसाची संततधार कायम आहे. जिल्ह्यातले 22 बंधारे पाण्याखाली गेल्याने 30 गावांचा थेट संपर्क तुटलाय. 3. कोल्हापूर पंचगंगा नदीवरचा घाट पूर्णपणे पाण्याखाली गेल्यामुळे नागरिकांनी या पाण्यामध्ये उतरू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. 4. महाड रायगड रोड पाण्याखाली वाहतूक बंद करण्यात आलं आहे. महाड पोलादपूर तालुक्यात कालपासून जोरदार पाऊस सुरू आहे. 5. डोंबिवली - स्टेशन रोड, आगरकर रोड, एमआयडीसी निवासी विभाग इथे साचले पाणी 6. भिवंडी जलमय , नदीला पूर , घरात , दुकानात पाणीच पाणी 7. बदलापूर शहरातून जाणाऱ्या कल्याण कर्जत जिल्हा मार्गावर पाणी 8. मध्य रेल्वे १५-२० मिनिटं उशिरानं पाऊस आणि धुक्यामुळं रेल्वेसेवेवर परिणाम 9. कर्जत पनवेल ट्रँकवर पाणी 10.मध्य रेल्वे १५-२० मिनिटं उशिरानं, पाऊस आणि धुक्यामुळं रेल्वेसेवेवर परिणाम 11. उल्हास नदीवरील छोटा पूल पाण्याखाली 12. मुंबईत जोरदार पावसाला सुरुवात, लोअर परेल भागात मुळधार पाऊस सुरू,  पश्चिम उपनगरातही पावसाची संततधार कायम, पूर्व उपनगरातही पाऊस 13. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली - खेड , मंडणगड तालुक्यासह सर्वच तालुक्यात पाऊस, काही ठिकाणी जोरदार पाऊस तर काही ठिकाणी हलक्या सरी 14. खेड - मुसळधार पावसामुळे बोरघरजवळ नदीचे पाणी रस्त्यावर. मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प 15. मुसळधार पावसामुळे कल्याण रेल्वे स्थानकात पाणी साचल्याने सध्या कर्जत तसंच कसाराकडली वाहतूक ठप्प 16. कोकणात समुद्राला उधाण
    First published:

    Tags: Kalyan, Maharashtra, Railway, Rain, कल्याण, महाराष्ट्र

    पुढील बातम्या