• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • कोरोनामुळे महाराष्ट्रात 'देऊळ बंद', पण प्रसिद्ध हाजी अली दर्गा ट्रस्टनं घेतला अजब निर्णय

कोरोनामुळे महाराष्ट्रात 'देऊळ बंद', पण प्रसिद्ध हाजी अली दर्गा ट्रस्टनं घेतला अजब निर्णय

कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. या व्हायरसने एकाचा बळी घेतला असून रुग्णांची संख्या 42 वर पोहोचली आहे.

  • Share this:
    मुंबई,18 मार्च: चीनमधून पसरलेल्या कोरोना व्हायरसने महाराष्ट्रात थैमान घातलं आहे. कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. या व्हायरसने एकाचा बळी घेतला असून रुग्णांची संख्या 42 वर पोहोचली आहे. हेही वाचा...इराणमधून आलेले 22 भाविक कोरोनामुळे महाराष्ट्रात अडकले, पैसे संपल्याने होताहेत हाल कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने उपाययोजना सुरु केल्या आहेत. राज्यातील शाळा महाविद्यालये बंद करण्यात आली आहे. सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आली आहेत. एवढेच नाही तर राज्यातील लहान-मोठी मंदिरे भाविकांसाठी बंद करण्यात आली आहे. असं असताना मुंबईतील प्रसिद्ध हाजी अली दर्गा ट्रस्टनं अजब निर्णय घेतला आहे. तो म्हणजे बंद न करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, दर्ग्यावर येणाऱ्या भाविकांसाठी काही बंधनं घालण्यात आल्याची माहिती हाजी अली दर्गा ट्रस्टचे प्रशासकीय अधिकारी मोहम्मद अहमद ताहेर यांनी दिली आहे. हेही वाचा... कोरोनाच्या विळख्यात अडकलेल्या इटलीतून मुंबईच्या मुलीची सुटका, वडिलांनी मोदींना म्हटलं ‘बापमाणूस’ कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक एक तासानंतर दर्गा सेनिटाईज करण्यात येणार आहे. दर्गा आधी भाविकांसाठी दिवसभरात 10 ते 11 तास खुला ठेवण्यात येत होता. आता मात्र, केवळ 4 ते 5 तास खुला ठेवण्यात येणार आहे. नमाझ पठणासाठीही कमीत कमी भाविकांनी दर्ग्यावर यावे, असे आवाहन देखील ट्रस्टने केलं आहे. मोहम्मद अहमद ताहेर यांनी सांगितलं की, हाजी अली दर्ग्यावर दररोज 50 हजारांहून जास्त भाविक येतात. या पार्श्वभूमीवर दर्ग्याची स्वच्छता आणि भाविकांच्या सुरक्षिततेसाठी विशेष काळजी घेण्यात येत कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक एक तासानंतर दर्गा सेनिटाईज करण्यात येणार आहे. हेही वाचा...IPL मध्ये आता आणखी एक ट्वीस्ट, एप्रिलमध्ये नाही तर... दरम्यान, हाजी अली दर्ग्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्डनेही घेतली आहेत. येथे देश-विदेशातील हजारो नागरिक दररोज भेट देतात. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. कोरोना व्हायरसची भीती असताना हाजी अली दर्गा बंद न ठेवण्याचा निर्णय ट्रस्टनं घेतला आहे, त्यामुळे सर्वत्र तर्कविर्तक मांडले जात आहे.
    Published by:Sandip Parolekar
    First published: