• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • BREAKING: आजच लॉकडाऊनची घोषणा होणार? मुंबईच्या पालकमंत्र्यांची महत्त्वाची माहिती

BREAKING: आजच लॉकडाऊनची घोषणा होणार? मुंबईच्या पालकमंत्र्यांची महत्त्वाची माहिती

राज्यामध्ये कोरोनाची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. कोरोनाचा विळखा राज्याभोवती वाढत आहे. अशावेळी लॉकडाऊन होणारच असे संकेत सरकारमधील अनेक नेते देत आहे. याच पार्श्वभूमिवर मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

  • Share this:
मुंबई, 13 एप्रिल: राज्यामध्ये कोरोनाची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. कोरोनाचा विळखा राज्याभोवती वाढत आहे. अशावेळी लॉकडाऊन (Lockdown in Maharashtra) होणारच असे संकेत सरकारमधील अनेक नेते देत आहे. याच पार्श्वभूमिवर मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी अशी माहिती दिली आहे की, आजच कडक लॉकडाऊनबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. लॉकडाऊनबाबत नियमावलीही (Guidelines for Maharashtra Lockdown) आज तयार होईल तर लॉकडाऊन लागणे हा अंतिम निर्णय असणार आहे, गेले काही दिवस मिटींग करतो आहोत, अशीही माहिती यावेळी त्यांनी दिली. या बैठकांमध्ये विरोधी पक्षाच्या नेत्यांना विश्वासात घेत असल्याची माहिती त्यांनी दिली. टास्क फोर्सची चर्चा केली असून लोकांचीही मत जाणून घेतली जात आहेत असंही ते म्हणाले. राज्यात आणि मुंबईमध्ये सर्वाधिक केसेस (Increasing Number of Corona Cases in Mumbai and Maharashtra) आहेत पण मुंबई आणि महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना चाचण्या होत आहेत, असंही ते म्हणाले. पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार ब्रेक द चेन (Break the Chain) मोहिमेचा भाग म्हणून महाराष्ट्रात लॉकडाऊनसाठी मार्गदर्शक तत्त्वे निश्चित केली जात आहेत. आज यावर एक मोठा निर्णय होणार आहे. त्यांनी अशी माहिती दिली आहे की, हा लॉकडाऊनचा निर्णय अचानक होणार नाही. शिवाय कोरोनाच्या संक्रमणाला तोंड देण्यासाठी मुंबईत बेड्स देखील वाढवले जात असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
शिवाय महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज प्रतिक्रिया दिल्याप्रमाणेच अस्लम शेख यांनी देखील असे सांगितले की लॉकडाऊन कसा असणार याबाबत अंतिम आणि चांगली एसओपी मुख्यमंत्र्यांकडून तयार केली जात आहे. त्यावर सीएम आज निर्णय घेतील. लोकांचे हाल व्हायला नको अशीच भूमिका असल्याचं शेख यांनी स्पष्ट केलं आहे. त्यांनी असे देखील म्हटले की अचानक लॉकडाऊन केला त्यावेळी अनेकांचे हाल झाले होते. लॉकडाऊन या शब्दाला लोकं घाबरतात, त्यामुळे पूर्ण लॉकडाऊन न करता काही निर्बंध लागू करता येतील का याबाबत विचार करून एसओपी जारी केली जाईल, असंही अस्लम शेख म्हणाले. अस्लम शेख यांनी कुणाचेही नाव न घेता अशी देखील टीका केली आहे की मोठमोठे सिने अभिनेते आणि क्रिकेटर विनाकारण बेड्स घेत आहेत.
Published by:Janhavi Bhatkar
First published: