News18 Lokmat

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, 5 ठार 7 जखमी

मुंबईकडे निघालेल्या टेम्पोने ओव्हरटेक करताना पोलादपूरकडे निघालेल्या मिनिडोअरला धडक दिली.यात मिनिडोअरचा चुराडा झाला.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Oct 13, 2017 01:10 PM IST

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, 5 ठार 7 जखमी

13 आॅक्टोबर : मुंबई गोवा महामार्गावर पोलादपूरनजीक पार्ले गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात 5 जण जागीच ठार झालेत,तर 7 जण जखमी आहेत . मुंबईकडे निघालेल्या टेम्पोने ओव्हरटेक करताना पोलादपूरकडे निघालेल्या मिनिडोअरला धडक दिली.यात मिनिडोअरचा चुराडा झाला.

आज सकाळी पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला . जखमींना उपचारासाठी पोलादपूर आणि महाड इथल्या रुग्णालयात हलवण्यात आलंय. सात जखमींमध्ये ज्यांची प्रकृती गंभीर आहे, त्यांनी मुंबईत हलवण्यात येईल,असं सूत्रांकडून कळतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 13, 2017 01:10 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...