कोल्हापूर, संदीप राजगोळकर, 06 जुलै : मुंबई – गोवा हायवेचे अभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर चिखलफेकल्यानंतर नितेश राणे यांची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली. तर, या चिखलफेक प्रकरणाचे पडसाद आता कोल्हापुरात देखील उमटताना दिसत आहेत. आमदार नितेश राणे यांचा पुतळा हा कोल्हापुरातील करंबळी या गावी जाळण्यात आला आहे. कारण, चिखलफेकण्यात आलेले प्रकाश शेडेकर हे कोल्हापुरातील करंबळी गावचे रहिवासी आहेत. नितेश राणे यांचा पुतळा जाळत त्यांचा निषेध करण्यात आला. यावेळी गावकऱ्यांनी नितेश राणेंविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली. या चिखलफेक प्रकरणी कणकवली कोर्टाने नितेश राणे यांचा जामीन फेटाळला आहे. नितेश राणेंसह इतर आरोपींना कोर्टाने 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना शिवीगाळ करत त्यांच्या अंगावर चिखल फेकला. तसेच शेडेकर यांना आमदार नितेश राणे यांच्यासह नगराध्यक्ष समीर नलावडे आणि स्वाभिमान कार्यकर्त्यांनी गडनदी पुलाला बांधून ठेवले होते. या प्रकरणी पोलिसांनी आमदार नितेश राणे यांना काल अटक करण्यात आली होती.
कर्नाटकातील काँग्रेस – जेडीएस सरकार अडचणीत; 8 आमदारांचा राजीनामा
50 समर्थकांवर गुन्हा दाखल
दरम्यान, नितेश राणे आणि त्यांच्या जवळपास 50 समर्थकांवर कलम 353, 342, 332, 324, 323, 120(अ), 147, 143, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. नितेश राणेंसह सर्व आरोपींना शनिवारी दुपारी 3 वाजता कोर्टात हजर करण्यात आले. या प्रकरणावर दोन्ही बाजूंच्या वकिलांनी युक्तिवाद केला. अखेर कोर्टाने नितेश राणे यांच्यासह सर्व आरोपींना 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
स्नान करताना महिलेचा व्हिडीओ तयार करणारा पोलीस गजाआड
काय आहे प्रकरण?
मुंबई – गोवा हायवेचं सध्या चौपदरीकरणाचं काम सुरू आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी देखील होत असून काही ठिकाणी रस्ता खचल्याच्या घटना देखील समोर आल्या. त्यानंतर गुरूवार 4 जुलै रोजी नितेश राणे यांनी अभियंता प्रकाश शेडेकर यांना सर्विस रोड का नाही बांधला? गोव्यामध्ये सर्विस रोड होतो मग कणकवलीत का नाही? असा सवाल केला. यावेळी कार्यकर्त्यांनी प्रकाश शेडेकर यांच्या अंगावर चिखलाचं पाणी ओतून त्यांना खांबाला बांधण्याचा प्रयत्न देखील केला. यावेळी नितेश राणे यांनी 15 दिवसांत समस्या सोडव अशी तंबी देखील अभियंता प्रकाश शेडेकर यांना दिली होती.
VIRAL VIDEO : रिफाइंड तेलाचा टँकर उलटला, तेलासाठी ग्रामस्थांची उडाली झुंबड