नितेश राणेंच्या अटकेचा निषेध; कणकवलीत व्यापाऱ्यांचा बंद

नितेश राणेंच्या अटकेचा निषेध; कणकवलीत व्यापाऱ्यांचा बंद

आमदार नितेश राणे यांना अटक केल्यानंतर कणकवलीत व्यापाऱ्यांनी बंद पाळला आहे.

  • Share this:

कणकवली, दिनेश केळुसकर, 05 जुलै : आमदार नितेश राणे यांनी अभियंता प्रकाश शेडेकर यांना मुंबई – गोवा हायवेच्या कामाचा जाब विचारला. शिवाय, त्यांच्या अंगावर चिखलाचं पाणी देखील ओतलं. याप्रकरणी नितेश राणे यांना अटक करण्यात आली असून त्यांच्या अटकेचा कणकवलीत व्यापाऱ्यांनी निषेध केला आहे. नितेश राणेंच्या अटकेचा निषेध करत कणकवलीतील व्यापाऱ्यांनी बंद पाळला आहे. गुरूवारी नितेश राणे यांनी हायवे अभियंता प्रकाश शेडेकर यांना मुंबई – गोवा हायवेच्या कणकवलीतील कामाचा जाब विचारला. त्यानंतर त्यांच्या अंगावर चिखलाचं पाणी ओतलं. त्यानंतर नितेश राणे यांना अटक करण्यात आली. दरम्यान, त्यांना अटक देखील करण्यात आली असून यांच्या या कृत्यावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. अटकेनंतर नितेश राणे यांना प्रकृतीचं कारण दिल्यानं त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. नितेश राणे यांनी केलेल्या कृत्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी स्वतः माफी मागितली. तसंच 'नितेशनं केलेलं कृत्य चुकीचं होतं. मी त्याचं समर्थन करत नाही',असंही नारायण राणे यांनी म्हटलं.

Union Budget 2019 : पेट्रोल, डिझेल आणि सोनंही झालं महाग

अभियंत्यांचं काम बंद आंदोलन

दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंत्यांनी राज्यभर कामबंद आंदोलनाची हाक दिली. यावेळी त्यांनी प्रकाश शेडेकर यांना नितेश राणेंकडून झालेल्या मारहाणीचा निषेध केला.

काय आहे प्रकरण?

मुंबई – गोवा हायवेचं सध्या चौपदरीकरणाचं काम सुरू आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी देखील होत असून काही ठिकाणी रस्ता खचल्याच्या घटना देखील समोर आल्या. त्यानंतर गुरूवारी नितेश राणे यांनी अभियंता प्रकाश शेडेकर यांना सर्विस रोड का नाही बांधला? गोव्यामध्ये सर्विस रोड होतो मग कणकवलीत का नाही? असा सवाल केला. यावेळी कार्यकर्त्यांनी प्रकाश शेडेकर यांच्या अंगावर चिखलाचं पाणी ओतून त्यांना खांबाला बांधण्याचा प्रयत्न देखील केला. यावेळी नितेश राणे यांनी 15 दिवसांत समस्या सोडव अशी तंबी देखील अभियंता प्रकाश शेडेकर यांना दिली होती.

Union Budget 2019: बजेट सादर झाल्यानंतर नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया

First published: July 5, 2019, 3:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading