मुंबई गोवा महामार्ग ठप्प, जगबुडीच्या पाण्याची पातळी 7 मीटरने वाढली

महामार्ग ठप्प झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा दोन्ही बाजूला लगाल्या आहेत. या मोसमात आत्तापर्यंत सब्बल 6 वेळा महामार्ग ठप्प झाला होता.

News18 Lokmat | Updated On: Jul 29, 2019 05:38 PM IST

मुंबई गोवा महामार्ग ठप्प, जगबुडीच्या पाण्याची पातळी 7 मीटरने वाढली

चंद्रकांत बनकर, खेड 29 जुलै : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने कोकणाला तडाखा दिलाय. जगबुडी नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झालीय. नदीच्या पाण्याची पातळी तब्बल 7 मीटरने वाढलीय. नदीच्या पाण्याने धोक्याची पातळी वाढल्याने खेडमधल्या जगबुडी नदीच्या पुलावरून वाहतूक बंद करण्यात आलीय. मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक  ठप्प झालीय. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा दोन्ही बाजूला लगाल्या आहेत. या मोसमात आत्तापर्यंत सब्बल 6 वेळा महामार्ग ठप्प झाला होता.

नवी मुंबईत राष्ट्रवादीला खिंडार, सर्वच नगरसेवक घेणार हातात 'कमळ'

कशेडी घाटातही दरड कोसळली

गोवा महामार्गावर खेड ते पोलादपूर च्या दरम्यान कशेडी घाटात एक वळणावर महामार्ग खचत असून, लांबच्या लांब भेगा पडल्या आहेत, पावसाचा जोर वाढत असल्याने संध्याकाळी या भेगा रुंदावल्या आहेत. दरीकडील भाग देखील खचत असून महामार्ग पोलिसांनी या ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू केलीय. वाहन चालकांना वाहने सावकाश चालवण्याचं आवाहन कशेडी टॅप महामार्ग पोलिसांनी केलंय. रस्ता खचलेल्या ठिकाणी खबरदारीचा उपाय म्हणून बॅरिकेट्स देखील लावण्यात आले आहेत.

अमित शहांच्या रथातूनच निघणार मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा, असा आहे रथ!

Loading...

पुन्हा मुसळधार पावसाचा धोका

मुंबई आणि कोकण भागात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला मुसळधार पाऊस उसंत घेण्याची काही शक्यता नाही. पुढचे चार ते पाच दिवस अशीच परिस्थिती राहणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. पुढचे पाच दिवस रायगड आणि कोकणात अती मुसळधार पाऊस पडणार आहे. तर मुंबई आणि ठाणे परिसरातही मुसळधार पाऊस बरसणार असल्याचं हवामान खात्याने म्हटलं आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पावसाचा जोर वाढला आहे. या सोबतच मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातही दमदार पाऊस होईल असं हवामान खात्याने म्हटलं आहे.

काही दिवस पावसाने दडी मारली होती. उष्माही प्रचंड प्रमाणात वाढला होता. मात्र गेल्या आठवड्यात पाऊस पुन्हा परतला आहे. मुंबईजवळच्या कर्जत आणि वांगणी परिसरात दोन दिवसांपासून प्रचंड पाऊस झाल्याने उल्हास नदी ओव्हर फ्लो झाली होती. त्यामुळे हा परिसर पूर्ण पाण्याने वेढला होता. त्यात महालक्ष्मी एक्सप्रेस अडकल्याने NDRF आणि नौदलालाही पाचारण करण्यात आलं होतं. एक्सप्रेसमधल्या 1 हजारांपेक्षा जास्त लोकांना बचाव पथकाने बाहेर काढलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 29, 2019 05:38 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...