भीषण अपघातात एकुलता एक मुलगा गमावला, मुंबई-गोवा महामार्गावर मृत्यूचं सत्र सुरूच

भीषण अपघातात एकुलता एक मुलगा गमावला, मुंबई-गोवा महामार्गावर मृत्यूचं सत्र सुरूच

कळंबस्ते येथे दुचाकी आणि कंटेनरची जोरदार धडक झाली.

  • Share this:

चंद्रकांत बनकर, 1 फेब्रुवारी : मुंबई-गोवा महामार्गावरील कळंबस्ते येथे दुचाकी आणि कंटेनरची जोरदार धडक झाली. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली.

कंटेनर चालकाने दुचाकीला धडक देऊन पलायन केले होते. मात्र, पोलिसांनी या कंटेनरचा पाठलाग करून चालकाला पकडले आहे, अशी माहिती उपलब्ध झाली आहे. या अपघातातील शुभम मोहोड असे मयत दुचाकीस्वाराचाचे नाव आहे.

हा दुचाकीस्वार लोटे येथील राहणारा असल्याची माहिती आहे. शुभम हा एकुलता एक मुलगा होता. शुभमच्या अपघाताचे वृत्त समताच कुटुंबाने मोठा आक्रोश केला. घरातील एकुलता एक मुलगा गमावल्याने मोहोड कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

दरम्यान, मुंबई- गोवा महामार्ग मृत्यूचा सापळा झाला आहे की काय, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. कारण गेल्या काही दिवसांत या महामार्गावरील हा दुसरा अपघात आहे. यापूर्वी मागील आठवड्यात मुंबई गोवा महामार्गावर एसटी बस पुलावरून कोसळून मोठा अपघात झाला होता.

हेही वाचा- कुख्यात गँगस्टर एजाज लकडावालाच्या दुसऱ्या हस्तकाला बेड्या

माणगावजवळ ही घटना घडली होती. या अपघातामध्ये जवळपास 20 जण जखमी झाले होते. त्यापैकी 2 प्रवासी गंभीर जखमी झाले. अपघात झालेली बस मुंबईहून दापोलीकडे जात होती. परळहून दापोलीकडे जात असताना माणगावजवळ कळमजे इथे बस आली असता चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि गाडी पुलाचा कठडा तोडून खाली कोसळली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: accident
First Published: Feb 1, 2020 03:55 PM IST

ताज्या बातम्या