मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Mumbai Goa Highway accident: मुंबई-गोवा महामार्गावर दोन भीषण अपघात; लग्नाला निघालेली बस पलटली, दोन्ही अपघातांत 37 प्रवासी जखमी

Mumbai Goa Highway accident: मुंबई-गोवा महामार्गावर दोन भीषण अपघात; लग्नाला निघालेली बस पलटली, दोन्ही अपघातांत 37 प्रवासी जखमी

मुंबई-गोवा महामार्गावर दोन भीषण अपघात; लग्नाला निघालेली बस पलटली, दोन अपघातांत 37 प्रवासी जखमी

मुंबई-गोवा महामार्गावर दोन भीषण अपघात; लग्नाला निघालेली बस पलटली, दोन अपघातांत 37 प्रवासी जखमी

Mumbai Goa Highway accident: मुंबईहून कोकणात लग्नासाठी निघालेल्या बसला अपघात झाला आहे. या अपघातात बसमधील प्रवासी जखमी झाले आहेत.

खेड, 15 एप्रिल : मुंबई - गोवा महामार्गावर दोन अपघात (two accidents on Mumbai - Goa Highway) झाले आहेत. या दोन अपघातात एकूण 37 प्रवासी जखमी (37 passengers injured) झाले आहेत. त्यापैकी 15 प्रवासी गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. पहिला अपघात लक्झरी बसला भरणे गोवळवाडी येथे झाला आहे. तर दुसरा अपघात तवेरा गाडीचा झाला आहे.

परळ (Parel Mumbai)हून खेड तालुक्यातील (Khed Taluka) केळणे या गावात लग्नासाठी जात असताना खासगी आराम बसला अपघात झाला आहे. भरणे गोवळवाडी या ठिकाणी महामार्गाच्या कडेला खड्ड्यात जाऊन पलटली तर मुंबईहून जयगडला जाणाऱ्या तवेरा गाडीचा देखील भरणे वळंज वाडी या ठिकाणी अशाच प्रकारे महामार्गलगत खड्ड्यात पडून अपघात झाला आहे.

दोन्ही अपघातामध्ये 37 प्रवासी जखमी, त्यामध्ये पंधराहून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. दोन्ही अपघात पहाटे सहा ते साडेसहा वाजण्याच्या सुमारास झाले असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस, स्थानिक ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेतली. तसेच खेडमधील मदत ग्रुप आणि रेस्क्यू टीमचे जवानी ही घटना स्थळी मदतीला दाखल झाले. दोन्ही अपघातांमधील सर्व जखमींवर कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

पुण्यात चार वाहनांचा विचित्र अपघात

पुण्यातील वारजे पुलावर गुरुवारी (14 एप्रिल) सकाळी चार वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. यामध्ये एकाच कुटुंबातील चार जण गंभीर जखमी झाले आहेत. सकाळी दहाच्या दरम्यान माई मंगेशकर रुग्णालयाच्या समोरील पुलावर एका गाडीचा अचानक कमी वेग झाल्याने पुढील वँगनार गाडीवर मागील ट्रक धडकला तर पुढे टँकर असल्याने ही गाडीमध्येच दाबली गेली. हा अपघात इतका विचित्र, भयंकर होता, की गाडीचा कोणता भागी नीटसा ओळखता येत नव्हता. या अपघातात वँगनार गाडीचा चक्काचूर झाला. यामध्ये एकाच कुटुंबातील नवरा- बायको आणि दोन मुली गंभीर जखमी झाले आहेत.

या अपघातानंतर त्यांना माई मंगेशकर रुग्णालयात दाखल केले. या अपघातानंतर येथील महामार्गावर तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तर महामार्गावरील वाहन सेवा रस्त्यावर उतरल्याने वारजेतील रस्ते चक्काजाम झाले होते.

First published:
top videos

    Tags: Accident, Ratnagiri