मुंबई-गोवा हायवे चौपदरीकरणासाठी संपादित जमिनीला दिला जातोय पाच पट मोबदला !

मुंबई-गोवा हायवे चौपदरीकरणासाठी संपादित जमिनीला दिला जातोय पाच पट मोबदला !

संपादित करण्यात आलेल्या जमिनीच्या मोबदला वाटपाचं काम सुरू करण्यात आलं असून भरघोस मोबदला मिळू लागल्यामुळे भूमिपूत्रानी या चौपदरीकरणाला सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे

  • Share this:

दिनेश केळुसकर, रत्नागिरी

10 एप्रिल : मुंबई गोवा हायवे च्या चौपदरीकरणासाठी संपादीत करण्यात आलेल्या जमिनीला केंद्र सरकारकडून भूमिपूत्राना पाच पट मोबदला दिला जातोय. संपादित करण्यात आलेल्या जमिनीच्या मोबदला वाटपाचं काम सुरू करण्यात आलं असून भरघोस मोबदला मिळू लागल्यामुळे भूमिपूत्रानी या चौपदरीकरणाला सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे.

वाटप करण्यात येणाऱ्या मोबदल्यात त्या त्या जमिनीचा सध्याचा जो रेडी रेकनर आहे. त्या प्रमाणे जमिनीचा दर निश्चित करून  जो मोबदला येतो त्याची दुप्पट अधिक त्या जमिनीत असणारी इतर मालमत्ता उदा. फळझाडे,वनझाडे, घर, विहीर,दुकान, या सगळ्यांची किंमत मिळवण्यात आली आहे. या एकूण रकमेची पुन्हा दुप्पट करून जी रक्कम येते त्या एकूण रकमेवर पुन्हा 12 टक्के दर दिवशी या दराने  469 दिवसांचे व्याज आकारून जी रक्कम होते तेवढी रक्कम भूमिपूत्राना मोबदला म्हणून देण्यात येतेय.

मे 2017 पर्यंत हे भूसंपादन मोबदला वाटपाचं काम सुरू राहणार असून येत्या पावसाळ्यानंतर चौपदरीकरणाच्या कामास प्रत्यक्षात सुरुवात होईल अशी शक्यता आहे. या हायवेवरील 16 मोठ्या पुलांच बांधकाम वर्षभरापूर्वीच सुरू होऊन ते आता अंतिम टप्प्यात आहे. पुलांव्यतिरीक्त या संपूर्ण हायवेच्या चौपदरीकरणाच काम 19 कंपन्याना विभागून देण्यात आलंय. त्यामुळे हे काम जलदगतीने होईल असा विश्वास राष्ट्रीय महामार्ग विभागाने व्यक्त केलाय. या चौपदरीकरण प्रकल्पास 15 हजार कोटींपेक्षा जास्त खर्च येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 10, 2017 09:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading