मुंबई गोवा महामार्गावर बसची इनोव्हाला धडक, एक ठार

मुंबई गोवा महामार्गावर बसची इनोव्हाला धडक, एक ठार

गाडीचे पंक्चर काढत असताना लांजा मुंबई एसटीनेया इनोव्हाला धडक दिली.

  • Share this:

03 सप्टेंबर : मुंबई गोवा महामार्गावर एसटी बसने इनोव्हा गाडीला जोरदार धडक दिली. या अपघातात 1 जणांचा मृत्यू झालाय तर 4 जण जखमी झाले आहे. जखमींवर डेरवणच्या वालावलकर रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

इनोव्हा गाडीतून कोकणात गणेशोत्सवासाठी आलेले वळंजू कुटुंबीय मुंबईकडे आपल्या इनोव्हा गाडीतून परतत होते. रत्नागिरीतल्या आसुर्डे गावाजवळ गाडी पंक्चर झाली. गाडीचे पंक्चर काढत असताना लांजा मुंबई एसटीनेया इनोव्हाला धडक दिली. त्यात पंक्चर काढत असलेला चालक ठार झाला आणि बाजूला उभे असलेले बाकीचे चार जण किरकोळ जखमी झाले.

पाठीमागून येणाऱ्या स्विफ्ट कारमधील प्रवाशांनी जखमींना डेरवण रुग्णालयात आणले.

First published: September 3, 2017, 8:57 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading