शेतकऱ्यांसाठी आपत्कालीन निधीतून 2 हजार कोटी रुपये, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

शेतकऱ्यांसाठी आपत्कालीन निधीतून 2 हजार कोटी रुपये, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आपत्कालीन निधीतून 2000 कोटी रुपये देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला.

  • Share this:

मुंबई, 12 फेब्रुवारी : राज्य सरकारनं शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आपात्कालीन निधीतून 2 हजार कोटी रुपये देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला. 28 फेब्रुवारीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा केली जाणार आहे.

केंद्रातील मोदी सरकारनंतर राज्यातील फडणवीस सरकारनं देखील निवडणुकांच्या तोंडावर मोठा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना वाढीव मदत देण्याबाबत राज्य सरकार विचार करत असल्याची बातमी 'न्यूज18 लोकमत'नं दिली होती. त्यावर अखेर शिक्कामोर्तब झालं आहे.

शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान योजना

दोन हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांसाठीच प्रधानमंत्री किसान सन्मान योजना योजना लागू होणार आहे. पण, विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतांश शेतकऱ्यांकडे कोरडवाहू शेती असली तरी ती दोन हेक्टर म्हणजे पाच एकरपेक्षा अधिक आहे. सध्या या भागात तीव्र दुष्काळ आहे. त्यामुळे दोन हेक्टरची मर्यादा वाढवण्याची किंवा ती काढून टाकण्याची तसंच रक्कम वाढवण्याची मागणी या भागांतील आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून केली आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतंर्गत शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजाराची मदत केली जाणार आहे. तिन हफ्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होणार आहे. पहिल्या हफ्त्याकरता आधारकार्ड अनिवार्य नसून त्यापुढे मात्र आधार कार्ड अनिवार्य आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेकरता 72 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेचा 12 कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

टोल नाक्याजवळ येताच एसटी बसचे ब्रेक झाले फेल; काळजाचा ठोका चुकविणारा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 12, 2019 02:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading