LIVE NOW

BREAKING LIVE: शरद पवारांचा ईडीकडे जाण्याचा निर्णय रद्द, शिवसेनेचे मानले आभार!

शरद पवारांना ईडीने कोणतीही नोटीस पाठवली नसली तरी शरद पवार आज स्वतःहून ईडीच्या कार्यालयात जाणार आहेत. पण त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांना ईडीच्या कार्यालयासमोर जमू नका, असं आवाहन केलं आहे.

Lokmat.news18.com | September 27, 2019, 1:50 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated September 27, 2019
auto-refresh

Highlights

Load More
मुंबई, 27 सप्टेंबर : शरद पवारांना ईडीने कोणतीही नोटीस पाठवली नसली तरी शरद पवार आज स्वतःहून ईडीच्या कार्यालयात जाणार होते. पण त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांना ईडीच्या कार्यालयासमोर जमू नका, असं आवाहन केलं आहे. तर दुसरीकडे ईडी कार्यालयाच्या परिसरात आज कलम 144 म्हणजेच जमावबंदीचे आदेश देण्यात आलेत. आज दुपारी दोन वाजता ईडी कार्यालयात पवार जाणार आहेत. ईडीनं पवारांना कार्यालयात येऊ नये असं आवाहन केलं आहे. दरम्यान, शरद पवारांना ईडीने चौकशीसाठी हजर राहण्यासाठी कुठलीही नोटीस पाठवली नसल्याने त्यांना ईडी कार्यालयात उपस्थित राहण्याची गरज नसल्याचं स्पष्टीकरण ईडीकडून देण्यात आलं आहे. त्यामुळे शरद पवारांना घराबाहेर पडणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.