राज ठाकरेंना ईडीची नोटीस, ठाण्यात मनसे कार्यकर्त्यानं केली आत्महत्या

राज ठाकरेंना ईडीची नोटीस, ठाण्यात मनसे कार्यकर्त्यानं केली आत्महत्या

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीनं नोटीस बजावल्याच्या कारणामुळे ठाण्यातील एका मनसे कार्यकर्त्याने आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आलं आहे.

  • Share this:

ठाणे, 21 ऑगस्ट : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीनं नोटीस बजावल्याच्या कारणामुळे ठाण्यातील एका मनसे कार्यकर्त्याने आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आलं आहे. प्रवीण चौगुले असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. मंगळवारी (20 ऑगस्ट रात्री उशिरा ही घटना घडली आहे. प्रवीण हा मनसेचे ठाणे जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांचा जवळचा व्यक्ती असल्याची माहिती आहे. प्रवीणनं स्वतःला जाळून घेत आपलं आयुष्य संपवलं. 'राज ठाकरे यांना ईडीनं नोटीस बजावली. यामुळे त्यांना चौकशीला सामोरे जावं लागणार आहे. यामुळे दुखावलो असून मी आत्महत्या करणार आहे', असं प्रवीणने त्याच्या मित्रांना आत्महत्येपूर्वी सांगितलं होतं. प्रवीणच्या आत्महत्येची माहिती कळताच मनसेच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याचा मृतदेह कळव्यातील शिवाजी रुग्णालयात पोस्टमार्टेमसाठी दाखल करण्यात आला. दरम्यान, प्रवीण आत्महत्या करण्यापूर्वी फेसबुकवर राज ठाकरेंच्या समर्थनार्थ जवळपास शेकडो पोस्ट केल्या आहेत. या पोस्टमध्ये त्यानं ईडीविरोधात अपशब्ददेखील वापरले आहेत.

(वाचा : पी. चिदंबरम यांच्या अडचणीत वाढ, अटक होण्याची शक्यता)

राज ठाकरेंना ईडीची नोटीस

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने कोहिनूर मिल प्रकरणी नोटीस बजावली आहे. 22 ऑगस्टला राज ठाकरेंना ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी बोलवण्यात आलं आहे. या प्रकरणामुळे मनसेच्या अनेक कार्यकर्त्यामध्ये संताप पाहायला मिळत आहे. आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांवर पोलिसांची वक्रदृष्टी पडली असून अशा कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटीस बजावल्या आहेत. ठाणे, कल्याण आणि डोंबिवली शहरातील शेकडो कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना अशा प्रकाच्या नोटीस बजावण्यात आल्या असून काहींना हजर राहण्यास सांगण्यात आलंय. कलम 149 नुसार या नोटीस बजावण्यात आल्या आहेत. मनसेच्या अनेक नेत्यांनी आंदोलनाचे इशारे दिले होते. तर काहींनी खळ खट्याक आंदोलनाचाही इशारा दिला होता. ही सगळी परिस्थिती लक्षात घेऊन कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती निर्माण होऊ नये म्हणून अशा प्रकारच्या नोटीस दिल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. सामाजिक शांतता भंग झाली तर त्यासाठी तुम्हाला जबाबदार धरलं जाईल, असा इशाराही या कार्यकर्त्यांना देण्यात आलाय.

(पाहा :  नाना पटोलेंच्या 'या' निर्णयामुळे काँग्रेसमध्ये मतभेद; पाहा SPECIAL REPORT)

राज यांचा सबुरीचा सल्ला

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना EDने दिलेल्या नोटीसवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया व्यक्त केलीय. एक प्रसिद्धी पत्रक काढून त्यांनी आपल्या भावना व्यक्त करत कार्यकर्त्यांना काही आदेशही दिले आहेत. राज यांना नोटीस मिळाल्यानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. काहींनी बंदची हाक दिली होती तर महाराष्ट्रभरातल्या कार्यकर्त्यांना मुंबईत येण्यात आवाहनही करण्यात आलं होतं. मात्र खुद्द राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना सबुरीचा सल्ला दिलाय. 22 तारखेला मुंबईत येऊ नका आणि सार्वजनिक मालमत्तेची नासधूस करू नका असा आदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिलाय. कुणी डिवचण्याचा प्रयत्न केला तरीही शांतच राहा असं आवाहनही त्यांनी केलंय.

(पाहा : VIDEO : राज ठाकरेंना नोटीस का बजावली? उन्मेश जोशी म्हणतात...)

राज ठाकरे यांनी ट्विटरवर एक पत्र टाकून सर्व कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलंय. कायदा सुव्यवस्था भंग होईल असं काहीही करू नका असंही त्यांनी म्हटलं आहे.

VIDEO: शंभर फेसबुक पोस्ट करून ठाण्यात मनसे कार्यकर्त्यांची आत्महत्या

Published by: Akshay Shitole
First published: August 21, 2019, 9:20 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading