मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Sushant Singh Case: रिया चक्रवर्तीची उलट तपासणी घेणाऱ्या DCP ला कोरोनाची लागण

Sushant Singh Case: रिया चक्रवर्तीची उलट तपासणी घेणाऱ्या DCP ला कोरोनाची लागण

धक्कादायक म्हणजे सीबीआयच्या अधिकाऱ्यांनीही अभिषेक त्रिमुखे यांची चौकशी केली होती.

धक्कादायक म्हणजे सीबीआयच्या अधिकाऱ्यांनीही अभिषेक त्रिमुखे यांची चौकशी केली होती.

धक्कादायक म्हणजे सीबीआयच्या अधिकाऱ्यांनीही अभिषेक त्रिमुखे यांची चौकशी केली होती.

  • Published by:  Sandip Parolekar
मुंबई, 29 ऑगस्ट: बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) आत्महत्येचा आता सीबीआय तपास करत आहे. मात्र, दुसरीकडे या प्रकरणी सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीची उलट तपासणी करणारे मुंबईतील वांद्रे येथील पोलिस उपायुक्त (DCP) अभिषेक त्रिमुखे यांना कोरोनाची लागण झाली आहे. हेही वाचा...SSR Case: चित्रपट निर्माता संदीप सिंहवरुन राजकारण तापलं, काँग्रेस-भाजपत जुंपली अभिषेक त्रिमुखे यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. धक्कादायक म्हणजे सीबीआयच्या अधिकाऱ्यांनीही अभिषेक त्रिमुखे यांची चौकशी केली होती. या प्रकरणात अभिषेक त्रिमुखे यांनी केलेल्या रिया चक्रवर्तीच्या चौकशीवरून अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. मिळालेली माहिती अशी की, वांद्रे येथील पोलिस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांच्यासह त्यांचे नातेवाईकही कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. सुशांतच्या आत्महत्येनंतर रिया चक्रवर्तीचे अभिषेक त्रिमुखे यांच्याशी अनेकदा फोनवर बोलणं झालं होतं, याबाबत कॉल डिटेलमध्ये खुलासा झाला होता. त्यावरून अभिषेक त्रिमुळे संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. सुशांत सिंह प्रकरणात सीबीआयला चौकशीत सहकार्य करण्यासाठी मुंबई पोलिसांनी अभिषेक त्रिमुखे यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. आतापर्यत दोन बड्या पोलिस अधिकाऱ्यांची चौकशी... सीबीआयचं पथक मुंबईत तळ ठोकून आहे. सुशांतसिंह प्रकरणी सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी आतापर्यंत दोन बड्या पोलिस अधिकाऱ्यांची चौकशी केली आहे. त्यात अभिषेक त्रिमुखे आणि परमजीत सिंह दहिया यांचा समावेश आहे. दुसरीकडे, या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या विशेष तपास पथकानं (SIT) कामचुकारपण केल्याचा आरोप केला जात आहे. यावरून सीबीआयचे अधिकारी मुंबई पोलिस विभागातील अधिकाऱ्यांची चौकशी करत आहेत. हेही वाचा..SSR Case : 'संदीप सिंहने भाजप कार्यालयामध्ये 53 फोन कॉल्स कुणाला केले?' धक्कादायक! 24 तासांत 14361 नवे रुग्ण राज्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या 24 तासांत 14361 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर 331 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही 7 लाख 48 हजारांवर पोहोचली आहे. तर आतापर्यत कोरोनानं राज्यात 23775 जणांचा बळी घेतला आहे. कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण मुंबईत आहेत.
First published:

Tags: Corona vaccine, Corona virus in india, Maharashtra police, Mumbai police, Sushant Singh Rajput

पुढील बातम्या