धक्कादायक ! मुंबईत महिलेची गळा चिरून निर्घृण हत्या

धक्कादायक ! मुंबईत महिलेची गळा चिरून निर्घृण हत्या

Crime News : सलग दुसऱ्या हत्येचं घटनेमुळे मुंबईतलं घाटकोपर परिसर हादरलं आहे.

  • Share this:

मनोज कुळकर्णी

मुंबई, 14 जुलै : सलग दुसऱ्या हत्येचं घटनेमुळे मुंबईतलं घाटकोपर परिसर हादरलं आहे. रविवारी (14 जुलै) घाटकोपरच्या नारायण नगर येथील लाल बहादूर शास्त्री मार्गावर एका महिलेचा गळा चिरलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला. ही महिला रक्ताच्या थारोळ्या पडलेली स्थानिकांना दिसल्यानंतर मोठी खळबळ उडाली. सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास परिसरातील रिक्षा चालकांना पादचारी मार्गावर या महिलेचा मृतदेह आढळला. याची माहिती तातडीनं पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनीही घटनास्थळ गाठत चौकशी केली आणि महिलेचा मृतदेह पोस्टमार्टेमसाठी राजावाडी रुग्णालयात पाठवला.  या प्रकरणी घाटकोपर पोलीस तपास करत आहे. मृतदेह सापडलेल्या महिलेची हत्या का करण्यात आली? ही महिला कोण होती? यासह तिची ओळख पटवण्याचं काम सध्या पोलीस करत आहे.

(पाहा :अ‍ॅडव्हेंचर पार्कमधील राइड अचानक कोसळली, दुर्घटनेचा LIVE VIDEO)

शुक्रवारीदेखील घाटकोपरमध्ये एका युवकाची निर्घृण हत्या करण्यात आली होती. किरकोळ वादातून दोन शेजाऱ्यांनी मिळून अश्विनी उर्फ सोनू कुमार दुबे (वय 29 वर्ष)) याला मारहाण केली. या मारहाणीत दुबेचा मृत्यू झाला. घाटकोपरमधील असल्फा व्हिलेज परिसरातील ही घटना आहे. या प्रकरणी नरेंद्र राणे आणि राहुल राऊत या दोघांनापोलिसांनी अटक केली.

(पाहा :SPECIAL REPORT : प्यार में धोखा ! बॉयफ्रेंडनंच केली 'त्या' मॉडेलची निर्घृण हत्या)

आत्महत्येचा असा VIDEO पाहिला नसेल, कॅमरे सुरू केला आणि...

First published: July 14, 2019, 10:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading