मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Mumbai Crime : मित्राच्या साथीने पत्नीनेच केला पतीचा कार्यक्रम केला, मृतदेह पाहून पोलिसही धास्तावले

Mumbai Crime : मित्राच्या साथीने पत्नीनेच केला पतीचा कार्यक्रम केला, मृतदेह पाहून पोलिसही धास्तावले

मुंबईतील साकीनाका येथे एक भयानक परिस्थीतीत मृतदेह आढळून आला आहे. नागरिकांच्या सूचनेनुसार पोलिसांनी एका खोलीची पाहणी केल्यानंतर हे प्रकरण समोर आले आहे.

मुंबईतील साकीनाका येथे एक भयानक परिस्थीतीत मृतदेह आढळून आला आहे. नागरिकांच्या सूचनेनुसार पोलिसांनी एका खोलीची पाहणी केल्यानंतर हे प्रकरण समोर आले आहे.

मुंबईतील साकीनाका येथे एक भयानक परिस्थीतीत मृतदेह आढळून आला आहे. नागरिकांच्या सूचनेनुसार पोलिसांनी एका खोलीची पाहणी केल्यानंतर हे प्रकरण समोर आले आहे.

  • Published by:  Sandeep Shirguppe

मुंबई, 20 जुलै : मुंबईतील साकीनाका येथे एक भयानक परिस्थीतीत मृतदेह आढळून आला आहे. नागरिकांच्या सूचनेनुसार पोलिसांनी एका खोलीची पाहणी केल्यानंतर हे प्रकरण समोर आले आहे. प्राथमिक माहितीनुसार पती वारंवार संशय घेत असल्याने कंटाळलेल्या पत्नीने मित्राच्या मदतीने त्याची हत्या केल्याची माहिती मिळाली आहे. हे प्रकरण झाकण्यासाठी पत्नीने थेट पतीला खोली भाड्याने घेऊन कपाटात मृतदेह ठेवला होता. (Mumbai crime)

मिळालेल्य प्राथमिक माहितीनुसार, मुंबईतील साकि नाका येथे एक दाम्पत्य राहत होते. दरम्यान त्यांच्यात वारंवार संशयावरून भांडण व्हायचे. आपला पती सारखे भांडण करतो म्हणून पत्निला याचा त्रास व्हायचा या रागातून तिने थेट पतीचा खून केल्याची घटना समोर आली आहे. कोणालाही खबर न लागता तिने जवळच एक खोली भाड्याने घेऊन पतीचा खून करत मृतदेह कपाटात लपवून ठेवला.

हे ही वाचा : 'भावना गवळींना महाराष्ट्र सरकारकडून क्लीन चीट नाही', एकनाथ शिंदेंचं मोठं विधान

मात्र अनेक दिवस ठेवल्याने दुर्गंधी येऊ लागली आणि शेजाऱ्यांनी तक्रार केली आणि त्यामुळे गंभीर गुन्हा उघडकीस आला. साकीनाका पोलिसांनी पतीची हत्या करणारी महिला आणि तिच्या साथीदाराला अटक केली आहे. मुंबईतील साकीनाका येथील यादवनगरमध्ये नसीम शेख आणि रुबिना शेख हे पती-पत्नी राहत होते. त्यांच्या घरापासून हाकेच्या अंतरावर एका भाड्याने घेतलेल्या खोलीमधून दुर्गंधी येत असल्याने येथील रहिवाशांनी पोलिसांकडे तक्रार केली होती या तक्रावरून पोलिसांनी कुलूप तोडून घर उघडले असता कपाटामध्ये कुजलेल्या स्थितीतील मृतदेह आढळला.

आजुबाजूच्या रहिवाशांनी हा मृतदेह नसीम शेख याचाच असल्याचे सांगितले. ओळख पटल्यावर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक बळवंत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्य़क निरीक्षक धीरज गवारे, अर्जुन कुदळे, वाल्मिक कोरे यांच्यासह लोणकर, चव्हाण, बनसोडे यांची पथके तयार करण्यात आली. तपासदरम्यान नसीम यांची पत्नी गायब असल्याचे समजले. अखेर पोलिसांनी रुबिना हिला शोधून काढले.

हे ही वाचा : कच्च्या तेलाच्या दरात वाढ, मुंबईसह तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर पाहा

दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नसीम घरी एकटाच असताना मित्र सैफ फारुकी याच्या मदतीने गळा दाबून मारल्याचे ती म्हणाले. पोलिसांनी सैफ यालाही अटक केली. नसीम चारित्र्यावर संशय घेऊन शारीरिक आणि मानसिक छळ करीत असल्याने त्याची हत्या केल्याचे रुबिना म्हणाली. दोघांनी नसीमचा मृतदेह लपविण्यासाठी खोली भाड्याने घेतली. तेथूनही मृतदेहाची विल्हेवाट लावायची होती; मात्र ती संधी मिळाली नाही आणि दुर्गंधी सुटल्याने प्रकरण समोर आले आहे.

First published:

Tags: Crime news, Mumbai, Mumbai News, Mumbai Poilce

पुढील बातम्या