मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नोटीस, उत्तरासाठी दिली मुदत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याबद्दल दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवरून नोटीस पाठवण्यात आली आहे. आता त्यावर उत्तर देण्यासाठी 4 डिसेंबरपर्यंत वेळ दिला आहे.

News18 Lokmat | Updated On: Nov 5, 2019 07:44 AM IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नोटीस, उत्तरासाठी दिली मुदत

मुंबई, 05 नोव्हेंबर : राज्यात सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरु असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना न्यायालयाने नोटीस पाठवली आहे. निवडणुकीवेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात माहिती लपल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. त्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने 1 ऑक्टोबरला आदेश दिला होता की, वकील सतीश उके यांच्याकडून आलेल्या आवेदनावर पुढची कारवाई करण्यात यावी.

मॅजिस्ट्रेट एसडी मेहता यांनी सोमवारी दिलेल्या आदेशात म्हटलं आहे की, फडणवीस यांना जनप्रतिनिधित्व कायदा, 1951 च्या कलम 125 ए नुसार नोटीस पाठवण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांना उत्तर देण्यासाठी 4 डिसेंबरपर्यंत वेळ देण्यात आली आहे. 1996 आणि 1998 मध्ये फडणवीस यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, दोन्ही प्रकरणांमध्ये आरोप निश्चिती करण्यात आली नव्हती.

उके यांनी 2014 मध्ये मॅजिस्ट्रेटच्या न्यायालयात एक अर्ज दाखल केला होता. त्यामध्ये फडणवीस यांच्याविरुद्घ कारवाई करण्याची मागणी केली होती. 2015 मध्ये उके यांचा अर्ज फेटाळून लावण्यात आला होता. त्यानंतर 2016 मध्ये त्यांनी सत्र न्यायालयात धाव घेतली. देवेंद्र फडणवीस यांनी तेव्हा मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. यात सत्र न्यायालयाचा आदेश रद्द करत मॅजिस्ट्रेटचा आदेश फेटाळून लावण्यात आला होता. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहचलं होतं.

सर्वोच्च न्यायालयाने आदेशात म्हटलं की, प्रतिज्ञा पत्रात माहिती लपवणे किंवा चुकीची माहिती दिल्याबद्दल जनप्रतिनिधित्व कायदा, 1951 च्या कलम 125 ए नुसार प्रकरण नोंद करण्यात आलं होतं. सर्वोच्च न्यायालयाने मॅजिस्ट्रेट न्यायालयाला उके यांच्या अर्जावर पुढे जाण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर 1 नोव्हेंबरला नागपुरमधील मॅजिस्ट्रेट न्यायालयात उके यांनी अर्ज सादर केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 5, 2019 07:44 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...