मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

...तर लोकल बंद केली जाईल, उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील 10 ठळक मुद्दे

...तर लोकल बंद केली जाईल, उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील 10 ठळक मुद्दे

'गर्दी कमी नाही झाली तर लोकल बंद करावी लागणार,' असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

'गर्दी कमी नाही झाली तर लोकल बंद करावी लागणार,' असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

'गर्दी कमी नाही झाली तर लोकल बंद करावी लागणार,' असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

  • Published by:  Akshay Shitole
मुंबई, 17 मार्च : 'आतापर्यंत राज्यात 40 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. कोरोनाग्रस्तांमध्ये 26 पुरूष 16 महिलांचा समावेश आहे. एका रुग्णाची परिस्थिती गंभीर आहे. मात्र राज्य सरकारने अद्याप बस किंवा ट्रेन बंद करण्याचा निर्णय घेतलेला नाही. गर्दी कमी नाही झाली तर लोकल बंद करावी लागणार,' असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतील 10 ठळक मुद्दे: 1. कमी उपस्थितीत कामकाज करण्याबाबत लवकरच निर्णय 2. गरज असेल तर प्रवास करा 3. सरकारी कार्यालयात 50 टक्के कर्मचारी ठेवण्याचा विचार 4. कठोर पावलं उचलण्याची आमची इच्छा नाही. 5. मुंबईसह इतर दुकानदारांना आवाहन करण्यात आलं आहे की दुकानं बंद ठेवावी. 6. गर्दी कमी करण्याच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल उचलत आहोत 7. सरकारी कर्मचाऱ्यांना आठवडाभर सुट्टी नाही. 8. पुढचे 15 दिवस खूप महत्वाचे 9. लोकांनी स्वत:हून काळजी घ्यावी 10. भविष्यात काही कठोर निर्णय घेतले जाऊ शकतात दरम्यान, राज्यात Covid-19 पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांची संख्या 40 वर पोहोचली आहे. राज्यात पहिल्या रुग्णाचा 17 मार्चला मृत्यू झाला. तो मुंबईत दाखल होता. त्यामुळे देशाच्या आर्थिक राजधानीत खळबळ उडाली आहे. मुंबईत कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी लोकलची गर्दी कमी होणं महत्त्वाचं आहे, त्यामुळे लोकल आणि मेट्रो बंदीच्या निर्णयाकडे अनेकांचं लक्ष होतं. महाराष्ट्रात सध्या लॉकडाउन नाही सध्या सरकारने मुंबईसह महाराष्ट्रातील शाळा-महाविद्यालयांसोबतच व्यायामशाळा , स्विमिंग पूल, सिनेमागृह, नाट्यगृह, शॉपिंग मॉल्स 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश सरकारनं दिले आहेत. मात्र संपूर्ण लॉक डाऊन केल्यास नागरिकांना आपला परिसर सोडून दुसरीकडे जाता येणार नाही. सध्या चीननंतर इटली आणि स्पेनमध्ये लॉक डाऊन लागू करण्यात आला आहे. जर्मनी आणि फ्रान्सनेही संपूर्ण लॉकडाउन घोषित केला. त्यामुळे केवळ गरज असेल अशाच परिस्थिती लोकांना घराबाहेर पडता येईल. लॉक डाऊनमध्ये केवळ अन्न आणि औषध खरेदी, रुग्णालय, बँक किंवा बालक आणि वृद्धांची काळजी घेण्यासाठी घर सोडण्याची मुभा असते. ट्रेन, बस, हॉटेल, रेस्टॉरंट आणि रुग्णालयं वगळता सार्वजनिक सेवा बंद ठेवण्यात येतात. संचारबंदीसारखी परिस्थिती ओढवते.
First published:

Tags: Coronavirus, Uddhav thackeray

पुढील बातम्या