कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी ठाकरे सरकारनं उचललं कठोर पाऊल

कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी ठाकरे सरकारनं उचललं कठोर पाऊल

मुंबईतील रस्त्यांरील मेडीकल आणि जीवनावश्यक पदार्थांची दुकानं सोडून इतर सर्व दुकानं एक दिवसाआड बंद करण्यात येणार आहेत.

  • Share this:

मुंबई,19 मार्च: कोरोना व्हायरसचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी ठाकरे सरकारनं कठोर पावलं उचलायला सुरुवात केली आहे. मुंबईतील रस्त्यांरील मेडीकल आणि जीवनावश्यक पदार्थांची दुकानं सोडून इतर सर्व दुकानं एक दिवसाआड बंद करण्यात येणार आहेत.

सर्वप्रथम मुंबईतील दादर, माहीम आणि धारावी भागातील दुकानं बंद ठेवण्यात येणार आहेत. राज्य सरकारने नागरिकांना अनावश्यक बाहेर पडण्यास मनाई केली होती. मात्र तरी देखील नागरिकांचा समिश्र प्रतिसाद पाहून अखेर सरकारने काही अंशत: मुंबई बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याला मुंबईकर कसा प्रतिसाद देत आहेत, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा...कोरोना संशयित तरुणाने संपवलं आयुष्य, रुग्णालयाच्या इमारतीवरुन घेतली उडी

कोरोना व्हायरसचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. मात्र, त्याला नागरिकांची साथ देखील तितकीच महत्त्वाची आहे. त्यामुळे आता मुंबईकरांना त्यांचं स्पिरीट दाखवण्याची वेळ आता आली आहे.

जीवनावश्यक वस्तूंचा, अन्नधान्य, औषधी यांचा साठा करू नये. राज्यातील जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा पुरेशा प्रमाणात व सुरळीत असल्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन जर कोणी व्यापारी साठेबाजी करीत असेल किंवा औषधांच्या, मास्कच्या किंमती अव्वाच्या सव्वा लावत असेल तर त्यावर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशीही माहिती मुख्यमंत्री कार्यालयातून देण्यात आली आहे.

हेही वाचा..महाराष्ट्रात 'या' जिल्ह्यांमध्ये पावसानं कहर, गारव्यामुळे कोरोनाची भीती वाढली

कोरोनाला रोखण्यााठी सरकारने केले मोठे बदल

1. राज्यातील शासकीय कार्यालये एक दिवसाआड पद्धतीने रोज 50 टक्के कर्मचारी येतील या हिशोबाने सुरु ठेवण्यात येतील.

2. रेल्वे, एसटी बसेस, खाजगी बसेस, मेट्रो ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही 50 टक्के प्रवासी क्षमतेने चालविण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

3. मुंबईमध्ये बेस्टमधील उभे राहणारे प्रवाशी बंद करण्यात येतील. तसेच प्रवाशी अंतराने बसावेत यासाठी तशा सूचना प्रवाशांना देण्यात येतील. शहरांमध्ये बसेसची संख्या वाढविण्यासाठी पर्यायी बसेसची व्यवस्था करण्यात येईल.

हेही वाचा...पुणेकरांनो आजपासून जरा जपूनच, जमावबंदीनंतर आता 'हे' 5 निर्णय लागू

4. शहरातील दुकानांच्या वेळा अशा तऱ्हेने ठरविण्यात येतील की, सर्व दुकाने अंतरा-अंतराने सकाळी व दुपारी सुरू होतील. बाजारातील तसेच गर्दीच्या ठिकाणातील रस्ते यामध्ये देखील एक दिवसाआड किंवा वेळांमध्ये बदल करण्यात येईल.

5. दवाखाने, वैद्यकीय महाविद्यालये या ठिकाणी सर्व प्रकारची साधनसामुग्री उपलब्ध राहील हे पाहण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. आवश्यक तेवढ्या अलगीकरण कक्ष व विलगीकरण कक्षांची सोय करण्यात आली आहे. आवश्यक ती वैद्यकीय उपकरणे, व्हेंटिलेशन, मास्क तसेच वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी वैयक्तिक सुरक्षा साधने, औषध सामुग्री देखील उपलब्ध आहेत.

First published: March 19, 2020, 8:51 AM IST

ताज्या बातम्या