काँग्रेस कार्यकर्त्याने सोनियांना रक्ताने लिहिलं पत्र, महाराष्ट्रात 'या' पक्षाबरोबर आघाडी नको!

काँग्रेस कार्यकर्त्याने सोनियांना रक्ताने लिहिलं पत्र, महाराष्ट्रात 'या' पक्षाबरोबर आघाडी नको!

रक्ताने पत्र लिहणारा हा युवक काँग्रेसचा कार्यकर्ता असून पक्षाने निर्णय मागे घेतला नाही तर त्याने बंडाचा इशारा दिलाय.

  • Share this:

प्रणाली कापसे, मुंबई 24 सप्टेंबर : महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष अनेक घटक पक्षांसोबत निवडणूक लढवत आहे. पक्षाला गळती लागल्याने काँग्रेसला छोट्या पक्षांची जास्त गरज आहे. त्यामुळे प्रत्येक पक्ष जोडण्याचं काम पक्षाचे नेते करताहेत. या आधीच वंचितने आघाडी न केल्याने पक्षाला फटका बसण्याची शक्यता व्यक्त होतेय. असं वातावरण असतानाच काँग्रेसचा एक मित्रपक्ष असलेल्या समाजवादी पक्षाबरोबर आघाडी नको अशी मागणी एका कार्यकर्त्याने केलीय. हा कार्यकर्ता गोवंडीचा असून त्याने दिल्लीत काँग्रेसच्या मुख्यालयाबाहेर ठाणच मांडलंय. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना त्याने रक्ताने पत्र लिहिलं असून समाजवादीशी आघाडी नको अशी आग्रही मागणी केलीय. अरीफ अब्बास सय्यद असं या कार्यकर्त्याचं नाव असून तो मुंबई युवक काँग्रेसचा प्रवक्ता आहे. काँग्रेसने समाजवादी पार्टीला विधानसभेसाठी तीन जागा सोडल्या आहेत.

'धनंजय मुंडे हे फक्त चमको आणि टपोरीगिरी करण्यात वस्ताद'

भायखळा, गोवंडी आणि औरंगाबादमधली एक जागा सोडण्यात आलीय. लोकसभा निवडणुकीत या जागांवर काँग्रेसला बढत मिळाली होती. त्या जागा समाजवादी पक्षाला सोडू नये असं या कार्यकर्त्याचं मत आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलीय. सगळ्यांना वंचितच्या यादीची प्रतिक्षा होती. MIMशी काडीमोड घेतल्यानंतर आम आदमी पक्षाने वंचित सोबत आघाडी करण्याचा प्रयत्न केला. मात्र जागा वाटपावरून न पटल्याने 'आप'नेही वंचितशी जास्त चर्चा न करता उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यामुळे 'वंचित' आता स्वबळावर सगळ्या जागा लढण्याची शक्यता आहे. लोकसभेत वंचितने उमेदवार देताना त्यांच्या जीतीही दिल्या होत्या. त्यामुळे वादही निर्माण झाला होता. आता विधानसभा निवडणुकीतही वंचितने उमेदवारांची जात जाहीर केलीय. सर्व जातींना सामावून घेण्यासाठीच जात जाहीर केल्याचा दावा वंचितने केला होता.

लोकसभेत तोंडावर आपटलात, आता झाकली मुठ ठेवा; तावडेंचा अशोक चव्हाणांना सल्ला

Loading...

काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?

रकाश आंबेडकर म्हणाले, वेगवेगळ्या समूहाला आम्ही प्रतिनिधींत्व दिलेलं आहे आणि हे लोकांसमोर आलं पाहिजे म्हणून आम्ही जात उमेद्वारांसमोर जात लिहिली आहे. जात कागदावर लिहिणं गरजेचं आहे.  इतर पक्षांना स्वतःबद्दल असणारे अवास्तव समज  आणि समोरच्या ताटातील मुख्य खाद्यपदार्थ पळवण्याची वृत्ती यामुळे कुणाबरोबर आघाडी होत नाहीये. ज्याचं अस्तित्व नाही असे आम्हाला राजकारण शिकवायला लागले तर आम्ही त्यांना धन्यवाद देतो आणि  तुमचं राजकारण तुम्हीच करा असं सांगतो.

विधानसभेच्या एण्ट्री आधीच राज ठाकरे भाजपच्या टार्गेटवर, 'कोहिनूर मिल'वर टीका

एमआयएम ने स्वतःचा रस्ता स्वतः निवडला, पण आम्ही आजही बोलायला तयार आहोत. त्यांचा प्रतिसाद आम्हाला हवा तसा नाही, ते माध्यमातून बोलत आहेत, प्रत्यक्षात ते का बोलत नाहीत. आप ने चर्चा  होण्याआधीच त्यांनी आपली यादी जाहीर केली, त्यांना आम्ही जागाही वाढवून दिल्या. आम्ही सगळ्या जागांवर निवडणूक लढवणार. या यादीत 4 मुस्लिम उमेदवार आहेत .मोठ्या प्रमाणावर मुस्लिम उमेदवार येतोय आणि आमच्यासाठी ही चांगली गोष्ट आहे च्यामुळे मतांच विभाजन होणार नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 24, 2019 07:47 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...