मुंबई, 26 मे : मुंबईत अनेक ठिकाणी खाऊगल्ली (Khau Galli Mumbai) आहेत. तशाच प्रकारे लालबाग (Lalbaugh)मध्ये खवय्यांसाठी एक खास चिवडा गल्ली (Chivda Galli Mumbai) आहे. ही चिवडा गल्ली खूपच प्रसिद्ध आहे. चिंचपोकळी स्थानकापासून काही अंतरावर असणारी चिवडा गल्ली विविध प्रकारच्या चिवड्यांसाठी प्रसिद्ध आहे. इथे दररोज वेगवेगळ्या प्रकारचे चिवडे विकण्यासाठी ठेवले जातात.
या परिसरात पहिल्यांदा अनेक कापड गिरण्या होत्या. यावरच अनेक मराठी कुटुंबे स्वतःचा उदरिर्वाह करत असत. मात्र कालावधी उलटल्यानंतर इथे एका मराठी व्यावसायिकाने एक चिवड्याच दुकान सुरू केले अन् हा व्यवसाय असाच वाढत गेला. त्यानंतर याला चिवडा गल्ली असं नाव पडलं. या भागात सध्या 30 ते 35 चिवड्याची दुकाने आहेत. यांचा विस्तार असाच होत गेला.
वाचा : मासे आणि दूध एकत्रितपणे खाल्ल्यास काय होते? जाणून घ्या त्यामागचं खरं कारण
बाजारात विवीध प्रकारचे चिवडे मिळतात. त्यासोबतच फरसाण, चकली तसेच मसाले देखिल मिळतात. या चिवडा गल्लीत साधारणतः एका महिन्यात लाखोंची उलाढाल होत असते.
चिवडा गल्लीतील व्यापारी निलेश पाटील यांनी सांगितले की, 70 वर्षांपासून चिवडा गल्ली अस्तित्वात आहे. इथे आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे चिवडे विकतो. पोहा, मका, फरसाण असे विविध प्रकारचे चिवडे आम्ही विकतो. साधारणपणे 200 ते 250 रूपये इतक्या भावाने विकतो.
येथे चिवडा खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांनी सांगितले की, आम्ही चिवडा घेण्यासाठी इथेच येतो. विविध प्रकारचे चिवडे असल्याने आम्हाला इथे एकाच ठिकाणी सर्व चिवडे मिळतात. तेल दर वाढल्याने थोडे दर वाढले आहेत, मात्र तरीही आम्ही इथे येतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.