मुंबई : या नराधमानं 9 वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर केली निर्घृण हत्या

मुंबईतील जुहू परिसरात नऊ वर्षीय मुलीवर सार्वजनिक शौचालयात बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली.

News18 Lokmat | Updated On: Apr 6, 2019 10:34 PM IST

मुंबई : या नराधमानं 9 वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर केली निर्घृण हत्या

मुंबई, 6 एप्रिल : मुंबईतील जुहू परिसरात नऊ वर्षीय मुलीवर सार्वजनिक शौचालयात बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी देवेंद्र वडविले उर्फ गुंडप्पा (३५ वर्ष)या नराधमाला अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही मृत चिमुकली दोन दिवसांपासून बेपत्ता होती. दोन दिवसांनंतर तिचा मृतदेह जुहू परिसरात आढळला. तिचा बलात्कार करून नंतर हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे.

दरम्यान, सकाळच्या सुमारास स्थानिकांनी चिमुकलीचा मृतदेह आढळल्यानंतर याची माहिती तातडीनं पोलिसांना आली. पोलिसांनी घटनास्थळावरून तिचा मृतदेह ताब्यात घेत पोस्टमार्टेमसाठी स्थानिक रुग्णालयात पाठवला. दुसरीकडे, या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. सीसीटीव्हीमध्ये ही चिमुकली शाळेच्या गणवेशात दिसत आहे. तसंच आरोपी देवेंद्र वडविलेदेखील मुलीच्या मागे-मागे चालत असल्याचं दिसत आहे.

आरोपीच्या अटकेसाठी संतप्त स्थानिकांनी आंदोलनदेखील केलं.वाचा अन्य बातम्या

VIDEO : नाशिकच्या माणसाचा सोनेरी सदरा, अंगावर तब्बल 9 कोटींचं सोनं!

निवडणुकीच्या धामधुमीत बारामतीत मोठी कारवाई, भरारी पथकाकडून रोकड जप्त

VIDEO: अजित पवार म्हणाले... 'पार्थने केलेली चूक फासावर चढवण्याऐवढी गंभीर नाही'

नेते प्रचाराला अन् गावकरी पाण्याला; हिंगोली जिल्ह्याचा SPECIAL REPORT

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 6, 2019 10:34 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...