Home /News /maharashtra /

मोठी बातमी! मुंबईत चिंता वाढली, महापौर किशोरी पेडणेकर कोरोनाची लागण

मोठी बातमी! मुंबईत चिंता वाढली, महापौर किशोरी पेडणेकर कोरोनाची लागण

गेल्या दोन तीन दिवसांपासून किशोरी पेडणेकर यांच्या कोविड 19 ची लक्षण दिसून येत होती.

मुंबई, 10 सप्टेंबर: मुंबई महापालिकेच्या कोविड 19 हॉस्पिटलची स्वत: सातत्याने पाहाणी करणाऱ्या मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. किशोरी पेडणेकर यांची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. सध्या त्यांची स्वॅब टेस्ट घेण्यात आली आहे. हेही वाचा...PHOTO नीट पाहा! येरवडा जेलमधून पळून गेले हे दोन कैदी, आहेत कोरोना पॉझिटिव्ह गेल्या दोन तीन दिवसांपासून किशोरी पेडणेकर यांच्या कोविड 19 ची लक्षण दिसून येत होती. त्यामुळे त्यांनी काळजी घेत अँटिजेन टेस्ट केली होती. ती आता पाँझिटिव्ह आली आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासोबत असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्याचेही स्वॅब टेस्ट घेण्यात येत आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांचे वय- 58 वर्षे आहे. त्यामुळे त्यांना अधिक काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार महापौर किशोरी पेडणेकर यांना बीएमसीच्या सेव्हन हिल्स या हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारांसाठी दाखल करण्याची शक्यताही सांगितली जात आहे. थोरल्या भावाचा कोरोनामुळे मृत्यू गेल्या काही दिवसांपूर्वी किशोरी पेडणेकर यांचे थोरले बंधू सुनिल कदम यांचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला होता. सुनिल कदम यांच्यावर महापालिकेच्या नायर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली होती. महापौर यापूर्वी झाल्या होत्या 'होम क्वारंटाईन' दरम्यान, गेल्या एप्रिल महिन्यात महापौर किशोरी पेडणेकर या देखील होम क्वारंटाइन झाल्या होत्या. BMCच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्वत:ला होम क्वारंटाईन केलं होतं. महापौर किशोरी पेडणेकर या 14 दिवस घरीच होत्या. महापौर किशोरी पेडणेकर काही पत्रकारांच्या संपर्कात आल्या होत्या. दुसरीकडे,  सत्ताधारी शिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी विरोधी पक्ष भाजपनं आणखी कंबर कसली आहे. कोविड 19 च्या मुद्द्यावरून मुंबईच्या महापालिकेच्या (BMC) महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात भाजप अविश्वास ठराव मांडणार आहे. सभागृहाची बैठक तातडीनं बोलवावी असून यासाठी भाजपचं महापौरांना पत्र लिहिलं आहे. मुंबईत कोविड काळात भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप भाजपनं केला आहे. या भ्रष्टाचारावरुन भाजप महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडणार आहे. हेही वाचा...गिरे फिर भी टांग उपर! चंद्रकांत पाटलांचा अशोक चव्हाण यांच्यावर हल्लाबोल दरम्यान, महापौर किशोरी पेडणेकर यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह ठरल्या आहेत. त्यामुळे भाजपाचा महापौरांविरोधातला अविश्वास ठरावही लवकर मांडता येणार नाही आहे. कोरोना काळात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपनं केला आहे. या पार्श्वभूमीवर महापौरांविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडण्याची भूमिका भाजपने मांडली होती.
Published by:Sandip Parolekar
First published:

पुढील बातम्या