धक्कादायक! मुंबई रिक्षाचालकाची साताऱ्यात निर्घृण हत्या, रत्नागिरीत सापडला मृतदेह

धक्कादायक! मुंबई रिक्षाचालकाची साताऱ्यात निर्घृण हत्या, रत्नागिरीत सापडला मृतदेह

मुंबईत राहणाऱ्या रिक्षाचालकाची साताऱ्यामध्ये हत्या करण्यात आली तर त्याचा मृतदेह रत्नागिरीत सापडला. या धक्कादायक घटनेमुळे तीनही शहरांत भीतीचं वातावरण आहे.

  • Share this:

मुंबई, 07 ऑगस्ट : एका रिक्षाचालकाच्या हत्येनंतर मुंबई, सातारा आणि रत्नागिरी हादरली आहे. मुंबईत राहणाऱ्या रिक्षाचालकाची साताऱ्यामध्ये हत्या करण्यात आली तर त्याचा मृतदेह रत्नागिरीत सापडला. या धक्कादायक घटनेमुळे तीनही शहरांत भीतीचं वातावरण आहे. घाटकोपरमध्ये हा रिक्षाचालक राहत होता. मांडुळ तस्करी प्रकरणात त्याची हत्या झाली असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. तर या हत्येमध्ये पोलिसांनी मुख्य आरोपीसह 5 जणांना ताब्यात घेतलं आहे.

उदयभान रामप्रसाद पाल हे घाटकोपरमध्ये राहतात. ते रिक्षा चालवण्याचा व्यवसाय करतात. 17 तारखेला कामानिमित्त साताऱ्याला जातो असं सांगून ते घरातून गेले. पण त्यानंतर त्यांच्याशी कोणताही संपर्क झाला नाही. अखेर 23 जूनला पाल यांच्या पत्नीने घाटकोपर पोलीस स्थानकात पती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी प्रकरणाचा कसून शोध घेतला असता मांडुळ तस्करी प्रकरणात पाल यांची हत्या झाल्याची माहिती समोर आली.

पत्नीने केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी शोध सुरू केला. पाल यांचा मोबाईल साताऱ्यात शेवटचा अॅक्टिव्ह असल्याचं समोर आलं. त्यानंतर पोलिसांनी तपासाची दिशा बदलली. त्यावेळी साताऱ्यामध्ये राहणारा प्रदीप सुर्वे या व्यक्तीकडून पाल यांनी 21 लाख रुपये घेतले असल्याची माहिती समोर आली. काम झाल्यानंतर 1 कोटी रुपयांचा ग्राहक आणून देतो असा त्यांच्यात व्यवहार झाला होता. पण पालने 21 लाखांचा घोटाळा केला असल्याचं सुर्वेच्या लक्षात आलं.

इतर बातम्या - महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा रेड अलर्ट, धरणं ओव्हरफ्लो झाल्यामुळे महापुराचा धोका

आपल्याला 21 लाखांचा गंडा घातल्याने सुर्वेचा पाल यांच्यावर राग होता. याचा बदला घेण्यासाठी सुर्वे यांनी त्यांच्या 5 मित्रांसह पाल यांच्या हत्येचा कट रचला. प्लान केल्यानुसार पाल यांना साताऱ्यात बोलावलं आणि त्यांनी निर्घृण हत्या केली. बरं इतकंच नाही तर हत्येचा संशय येऊ नये म्हणून त्यांचा मृतदेह कराड-चिपळूनजवळच्या कुंभार्ली घाटातील दरीत फेकून दिला.

दरम्यान, पोलिसांनी प्रकरणाचा कसून तपास केल्यानंतर पाल यांच्या हत्येची उकल झाली. पोलिसांनी साताऱ्यातून प्रदीप सुर्वे या मुख्य आरोपीसह हत्येमध्ये सहभागी असलेल्या इतर 5 जणांना ताब्ययात घेतलं असून त्यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलीस सध्या पाल यांच्या मृतदेहाचा शोध घेत आहे.

========================================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 7, 2019 10:19 AM IST

ताज्या बातम्या