ठाणे, पालघरमध्ये उद्या 'रेड अलर्ट'; मुंबईसह इतर ठिकाणी काय असणार स्थिती?

ठाणे, पालघरमध्ये उद्या 'रेड अलर्ट'; मुंबईसह इतर ठिकाणी काय असणार स्थिती?

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मान्सून चांगलाच सक्रिय झाला आहे.

  • Share this:

मुंबई, 1 जुलै : ठाणे आणि पालघर जिल्हातील काही भागात उद्या (1 जुलै )अतिवृष्टी होऊ शकते, असा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मान्सून चांगलाच सक्रिय झाला आहे. मुंबई आणि परिसरालाही पावसाने झोडपून काढलं आहे. हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, मुंबईत आणखी काही दिवस मुसळधार पाऊस पडणार आहे. 'दोन दिवसांत मुंबईत 540 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. गेल्या 10 वर्षांतील हा उच्चांक आहे. फक्त पालघर जिल्ह्यातच पहाटे 4 ते 5 च्या दरम्यान 100 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली,' अशी माहिती मुंबई महापालिक आयुक्त प्रवीण परदेशी यांनी दिली आहे.

कोणत्या भागात किती पावसाचा अंदाज?

कोकणातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. दुसरीकडे, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा कोल्हापूर या भागातही चांगला पाऊस पडू शकतो, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

मराठवाड्यात काय असणार स्थिती?

औरंगाबाद, जालना, परभणी आणि हिंगोली या जिल्हांत 2 जुलै आणि 3 जुलै रोजी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसंच इतर जिल्ह्यातही काही प्रमाणात पाऊस पडू शकतो, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.

दरम्यान, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील ठराविक भाग वगळता इतर ठिकाणी फार पाऊस पडणार नाही, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

जलमय मुंबई, बेजार मुंबईकर

मागील दोन दिवसांपासून मुंबईत पावसाचा जोर वाढताना दिसत आहे. सोमवारी पहाटेपासून मुंबईत पावसानं जोरदार हजेरी लावल्यानं आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कामावर जाताना मुंबईकरांना कसरत करावी लागली. मध्य आणि पश्चिम रेल्वे उशिरानं धावत आहेत. मध्य रेल्वेच्या सायन रेल्वे स्थानकात पाणी असल्यानं मध्ये रेल्वेची सेवा जवळपास 20 मिनिटं उशिरानं आहे. अनेक भागांमध्ये पाणी शिरल्यानं मुंबईकरांना पाण्यातून वाट काढत ऑफिस गाठावं लागत आहे.

हवामान विभागानं देखील पुढील 2 दिवस हे मुसळधार पावसाचे असतील अशी घोषणा केली आहे. शिवाय, ठाणे, पालघर, कल्याण, डोंबिवलीमध्ये देखील मुसळधार पाऊस पडत आहे. रेल्वे उशिरा असल्यानं चाकरमान्यांना ऑफिसला पोहोचायला देखील उशिर होत आहे. शिवाय, रस्त्यांवर देखील वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र पाहायाला मिळत आहे.

3 दिवसाच्या मुसळधार पावसामुळे सुर्या नदीला पूर, 26 गावांना मोठा धोका

First published: July 1, 2019, 4:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading