मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Mumbai Air Quality Index : मुंबईची हवा श्वसनाच्या पात्रतेची नाही, पुढच्या चार दिवसांत आणखी धोका वाढणार

Mumbai Air Quality Index : मुंबईची हवा श्वसनाच्या पात्रतेची नाही, पुढच्या चार दिवसांत आणखी धोका वाढणार

मुंबईत मागच्या चार दिवसांपासून हवेची गुणवत्ता खराब होत आहे. मागच्या चार दिवसांत सर्वात खराब हवा 324 अशी नोंदवण्यात आली आहे.

मुंबईत मागच्या चार दिवसांपासून हवेची गुणवत्ता खराब होत आहे. मागच्या चार दिवसांत सर्वात खराब हवा 324 अशी नोंदवण्यात आली आहे.

मुंबईत मागच्या चार दिवसांपासून हवेची गुणवत्ता खराब होत आहे. मागच्या चार दिवसांत सर्वात खराब हवा 324 अशी नोंदवण्यात आली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 20 जानेवारी : मुंबईत मागच्या चार दिवसांपासून हवेची गुणवत्ता खराब होत आहे. मागच्या चार दिवसांत सर्वात खराब हवा 324 अशी नोंदवण्यात आली आहे. तर देशाची राजधानी दिल्लीत 336 अशी नोंदवण्यात आली आहे. दरम्यान दिल्ली आणि मुंबईत काही आकड्यांचा फरक राहिला आहे. यामुळे भविष्या मुंबई दिल्लीला मागे टाकण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या महिन्यात शहराचा वायु गुणवत्ता निर्देशांक (AQI) 'खूप खराब' राहण्याची ही दुसरी वेळ आहे. SAFAR या संस्थेच्या अंदाजानुसार हवेची गुणवत्ता आणखी दोन दिवस खराब राहण्याची शक्यता आहे, जानेवारी हा हवेच्या गुणवत्तेच्या बाबतीत गेल्या पाच वर्षांतील सर्वात वाईट ठरण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा : मुंबई, पुण्यासह राज्यात थंडीची लाट ओसरणार, पण हवामान विभागाने दिला हा इशारा

AQI च्या अंदाजानुसार हवेतील कार्सिनोजेनिक PM2.5 राहिल्यास श्वसनाचे आजार वाढण्याची शक्यता आहे. प्रचंड धूर आणि धुळीच्या प्रदूषणाव्यतिरिक्त, समुद्राच्या तापमानात असामान्य घट झाल्यामुळे मुंबई किनारपट्टीवरील वाऱ्याचा वेग कमालीचा कमी झाला आहे. त्यामुळे प्रदूषणाच्या प्रमाणात वाढ झाली आहे.

मागच्या दोन महिन्यात सर्वात जास्त हवा प्रदुषण होत असल्याची माहिती हवामान विभागाकडून येत आहे. मागच्या वर्षी म्हणजे 28 डिसेंबरला मुंबई  एअर क्वालिटी इंडेक्स हा 306 होता. यानंतर मागच्या दोन दिवसांत 311 ते 343 पर्यंत गेल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.  मुंबईतील माझगाव, चेंबुर, मालाड आणि अंधेरीत हवामान खराब झाल्याची माहिती समोर आली आहे.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, काल (दि.05) गुरुवारी एअर क्वालीटी इंडेक्स नुसार दुषीत हवामान नोंदवले गेले. दरम्यान आणखी हवा प्रदुषीत होण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. राज्यात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे.

राज्याचा पारा चढणार

हवामान विभागाकडून यंदा थंडीचा कालावधी कमी असल्याचे सांगण्यात आले आहे. परंतु मुंबईसह कोकण, खान्देश, नाशिक, नगर, पुणे, सातारा, औरंगाबाद जिल्ह्यांत कडाक्याची थंडी पडली होती. दरम्यान ही थंडी कमी होण्यासाठी आणखी 5 दिवसांचा कालावधी लागणार आहे.

हे ही वाचा : पश्चिम महाराष्ट्रासह कोकण किनारपट्टीवर थंडीचा जोर वाढणार, अलर्ट जारी

राज्यातील काही भागात दिवसभर 30 अंशांच्या पुढे तापमान असते तर रात्री अचानक थंडी पडते. याचबरोबर पहाटेच्या वेळी धुके आणि थंडी पडत असल्याने लोकांना आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. दरम्यान पुढच्या  5 दिवसांत सरासरी किमान तापमानात सुमारे 2-3 अंशांनी वाढ होऊन थंडी काहीशी कमी होण्यास सुरुवात होईल.

First published:

Tags: Mumbai, Mumbai News, Weather, Weather update