रात्री 3.30 वाजता मुंबई हायवेवर आयुष्य झालं 'लॉक', विचित्र अपघातात 3 जण जागीच ठार; पाहा VIDEO

रात्री 3.30 वाजता मुंबई हायवेवर आयुष्य झालं 'लॉक', विचित्र अपघातात 3 जण जागीच ठार; पाहा VIDEO

हा अपघात इतका भीषण होता, की ट्रकचा चक्काचूर झाला. ट्रकची अवस्था पाहिल्यानंतर ट्रकमध्ये असलेल्या मजुरांची काय अवस्था झाली असेल याचा अंदाज बांधता येऊ शकतो.

  • Share this:

Cविजय राऊत

पालघर, 11 नोव्हेंबर : गेल्या काही दिवसांपासून महामार्गांवर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. असाच एक अपघात मध्यरात्री 3.30 वाजता घडला. या विचित्र अपघाताच तीन मजुरांचा जागीच मृत्यू झाला. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वडवली गावाजवळ हा अपघात घडला.

रात्री 3.30च्या सुमारास काच वाहतूक करणाऱ्या ट्रकला भीषण अपघात झाला. हा ट्रक गुजरातहुन मुंबईच्या दिशेने जात होता. दरम्यान अचानक ट्रक चालकाकडून गाडीचे स्टेअरिंग लॉक झाले.त्याचवेळी अचानक ट्रकला कंटेनरनं मागून जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता, की ट्रकचा चक्काचूर झाला. ट्रकची अवस्था पाहिल्यानंतर ट्रकमध्ये असलेल्या मजुरांची काय अवस्था झाली असेल याचा अंदाज बांधता येऊ शकतो.

वाचा-अन्वय नाईक कुटुंबीयांसोबतच्या Viral Photoवर शरद पवारांनी केला खुलासा

वाचा-पुणे जिल्ह्यात महिलेचे डोळे निकामी करणारा आरोपी जेरबंद, अटकेनंतर केला अजब दावा

या भीषण अपघाताच्या व्हिडीओमध्ये ट्रकचा चेंदामेंदा झालेला दिसत आहे. अपघात झाल्यानंतर स्थानिकांनी लगेगच मदत कार्य करण्यास सुरुवात केली. ट्रकचं दार उघडल्यानंतर तीन मजुरांचा जागीच मृत्यू झाल्याचे कळले तर 5 जण गंभीर जखमी झाले आहे. जखमींना उपचारासठी तलासरी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

वाचा-दाऊदच्या आर्थिक साम्राज्याला खिंडार.. कसा झाला मालमत्तेचा लिलाव, पाहा VIDEO

दरम्यान, या अपघातानंतर ट्रकची झालेली अवस्था पाहून हा अपघाताचे स्वरूप किती भीषण होते, याचा अंदाज येतो. दरम्यान ट्रक चालकानं मद्यसेवन केले होते का, याची चौकशीही केली जाणार आहे. मात्र स्टेअरिंग लॉक झाल्यामुळे या तीन मजुरांचे आयुष्य लॉक झाले.

Published by: Priyanka Gawde
First published: November 11, 2020, 9:49 AM IST

ताज्या बातम्या