मुंबईतल्या AC लोकलचा गारेगार प्रवास होणार महाग

मुंबईतल्या AC लोकलचा गारेगार प्रवास होणार महाग

उन्हाळ्यात गारेगार प्रवासाचा आनंद घेणाऱ्या प्रवाशांना आता 1 जून पासून जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.

  • Share this:

स्वाती लोखंडे मुंबई 30 मे : मुंबईत लोकलचा प्रवास म्हणजे घामाच्या धारा आणि प्रचंड गर्दी असं समिकरण कायम असतं. मात्र पश्चिम रेल्वेने वर्षभरापूर्वी AC लोकल सुरू केली. त्याला प्रतिसादही चांगला मिळाला. सध्याच्या कडक उन्हाळ्यात लोकल मिळणारा प्रतिसाद वाढला आहे. वाढलेला प्रतिसाद पाहता पश्चिम रेल्वे ने AC लोकलच्या तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय घेतलाय.

सध्या फर्स्ट क्लासच्या 1.2 पट इतकं तिकीट AC लोकलचं आहे. त्यात वाढ होऊन हे तिकीट फर्स्ट क्लास तिकिटांच्या 1.3 पट इतकं होणार आहे. सध्या AC लोकलचं कमीत कमी भाडं हे 60 रुपये इतकं आहे. चर्चगेट ते विरार हे अंतर पार करण्यासाठी 205 रुपये इतकं एकेरी प्रवासाला मोजावे लागतात. यात वाढ होणार आहे. उन्हाळ्यात AC लोकलला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याने  एप्रिल मध्ये 1.84  इतकं उत्पन्न पश्चिम रेल्वेला झालं.

AC लोकल असाव्यात अशी मागणी मुंबईत गेली कित्येक वर्ष होत होती. त्यानंतर पाठपुराव्याला यश आलं आणि पश्चिम रेल्वेवर पहिले AC लोकल सुरू झाली. आता मध्य रेल्वेवरही AC लोकल सुरू होण्याची शक्यता आहे. सहा महिन्यांमध्ये AC लोकल मध्य रेल्वेवर सुरू होण्याची शक्यता आहे. काही तांत्रिक कारणांमुळे मध्य रेल्वेवरही AC लोकल रखडली होती.

तर मध्य रेल्वेला कायम दुय्यम वागणूक दिली जाते असा आरोप प्रवासी संघटनांनी केला आहे. पश्चिम रेल्वेवर कायम सगळ्याच  गोष्टी पहिल्यांदा आणल्या जातात असाही आरोप कायम केला जातो. त्यामुळे आता मध्य रेल्वेवरही AC लोकल आणण्यासाठी रेल्वेवरचा दबाव वाढतो आहे.

First published: May 30, 2019, 8:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading