नायर हॉस्पिटलमधून चोरीला गेलेलं 5 दिवसांचं बाळ सापडलं

नायर हॉस्पिटलमधून चोरीला गेलेलं 5 दिवसांचं बाळ गुरुवारी (13 जून) रात्री उशीरा सांताक्रूझमधील एका हॉस्पिटलमध्ये सापडलं. या घटनेनंतर नायर हॉस्पिटस पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे.

नायर हॉस्पिटलमधून चोरीला गेलेलं 5 दिवसांचं बाळ गुरुवारी (13 जून) रात्री उशीरा सांताक्रूझमधील एका हॉस्पिटलमध्ये सापडलं. या घटनेनंतर नायर हॉस्पिटस पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे.

  • Share this:
    मुंबई, 14 जून- नायर हॉस्पिटलमधून चोरीला गेलेलं 5 दिवसांचं बाळ गुरुवारी (13 जून) रात्री उशीरा सांताक्रूझमधील एका हॉस्पिटलमध्ये सापडलं. या घटनेनंतर नायर हॉस्पिटल पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. याआधी डॉ. पायल तडवी या एमबीबीएसच्या विद्यार्थिनीनं वरिष्ठ डॉक्टरांच्या त्रासाला वैतागून आत्महत्या केली होती. नायर हॉस्पिटलच्या वार्ड नंबर 7 मधून 5 दिवसांचं बाळ चोरीला गेलं होतं. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. एक महिला मुलाला खांद्यावर घेऊन जाताना दिसली. या प्रकरणी अग्रीपाडा पोलिसांनी अज्ञात महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी महिलेला ट्रॅक करून पोलिसांनी रात्री उशीरा बाळाला सहीसलामत सांताक्रूझमधील एका हॉस्पिटलमधून ताब्यात घेतलं. मिळालेली माहिती अशी की, 5 दिवसांपूर्वी नायर हॉस्पिटलमध्ये दहिसर येथील राहणारी महिला शीतल साळवी हिने एका मुलाला जन्म दिला होता. गुरुवारी शीतल वार्डमध्ये झोपली असताना एका अज्ञात महिलेने मुलाचे अपहरण केलं होतं. चोरट्या महिलेचे हे कृत्य हॉस्पिटलमध्ये बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्य़ात कैद झाले होते. झोपेतून जाग आल्यानंतर शीतलला आपलं बाळ बेडवर दिसलं नाही. तिने ही बाब हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्य़ांना सांगितली. अधिकाऱ्य़ांनी हॉस्पिटलमध्ये बसवलेले सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले असता त्यात एक महिला आपल्या बॅगेत बाळ घेऊन जाताना आढळून आली. अधिकाऱ्यांनी तातडीने ही माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी अवघ्या काही तासांत चोरीला गेलेलं बाळ सही सलामत शोधून काढलं. नातेवाईकांनी केले हे आरोप.. बाळ सापल्यानंतर शीतल साळवी यांच्या नातेवाईकांनी नायर हॉस्पिटल प्रसाशनावर बेजबाबदारपणाचा आरोप केला आहे. सुरक्षा गार्ड, वार्डमध्ये नर्स, डॉक्टर असतानाही एखादी महिला बाळाचे अपहरण कसे करु शकते, असा सवाल शीतल साळवी यांच्या भावाने उपस्थित केला आहे. मुंबईत उड्डाणपुलाखाली भीषण अग्नितांडव, गाड्या जळून खाक
    First published: