आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्याला अडीच लाखांची मदत, सरकारचा प्रस्ताव

आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्याला अडीच लाखांची मदत, सरकारचा प्रस्ताव

हिंदू विवाह कायदा, मुस्लिम विवाह कायदा या धर्तीवर आता राज्य सरकार बौद्ध विवाह कायदा आणणार आहे.

  • Share this:

मुंबई, 07 मे : आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी मदतीची रक्कम 5 पटीनं वाढवण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव आहे. आतापर्यंत आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्याला 50 हजाराची मदत केली जायची. आता 50 हजाराऐवजी अडीच लाखांची मदत देण्याचा सरकारचा प्रस्ताव आहे.

हिंदू विवाह कायदा, मुस्लिम विवाह कायदा या धर्तीवर आता राज्य सरकार बौद्ध विवाह कायदा आणणार आहे. याकरता सामाजिक न्याय विभागाने वेबसाईट वर प्रस्तावित कायद्याचा मसुदा टाकलाय ज्यावर समाजातील विचारवंत, तज्ञ यांच्या सूचना मागवल्या आहेत. विधीमंडळात चर्चा करून नंतर कायद्यात रूपांतर होईल अशी माहिती सामाजिक न्याय मंत्री दिलीप कांबळे यांनी दिली.

त्याच बरोबर आंतर जातीय विवाहाला प्रोत्साहन म्हणून राज्य सरकार देत असलेल्या मदतीमध्ये 5 पटीने वाढ करून आता ही रक्कम 50 हजारावरून अडीच लाख केली जाणार आहे याचं सूतोवाचही कांबळे यांनी केलं.

First published: May 7, 2018, 11:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading