मावळ लोकसभा मतदारसंघात रंगणार 'मुळशी पॅटर्न'

मावळ लोकसभा मतदारसंघात रंगणार 'मुळशी पॅटर्न'

आत राजकारणात देखील मुळशी पॅटर्नची जोरदार चर्चा सुरू आहे.

  • Share this:

मावळ, 30 मार्च : माढामधून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माघार घेत मावळमधून अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार याला उमेदवारी जाहीर केली. सध्या पार्थ पवार देखील जोरात प्रचार करताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्थ पवार विरूद्ध शिवसेना उमेदवार श्रीरंग बारणे असा सामना आता मावळमध्ये रंगणार आहे. पण, मावळ लोकसभा मतदारसंघात सध्या राजकारणातील 'मुळशी पॅटर्न'ची चर्चा सुरू आहे. शिवाय, तो पाहायाला देखील मिळत आहे.

या मतदारसंघातील शिवसेना उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचाराला भाजप कार्यकर्ते नाहीत. त्यामुळे मुळशीमधील शिवसैनिकांनी बारामतीतील भाजपच्या उमेदवाराचा प्रचार करणार नसल्याचं म्हटलं आहे. बारामतीतून कांचन कुल यांना भाजपनं उमेदवारी दिली आहे.

काय आहे 'मुळशी पॅटर्न'

मुळशी आणि हिंजवडी परिसर हा बारामती मतदारसंघात येतो. यावेळी भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचारासाठी शिवसैनिक सहभागी होताना दिसत नव्हते. त्यावर जोरात चर्चा देखील रंगली होती. अखेर शिवसैनिकांच्या असं वागण्याचं कारण स्पष्ट झालं आहे. जोपर्यंत मावळमध्ये श्रीरंग बारणे यांच्या प्रचारामध्ये भाजपचे कार्यकर्ते येत नाहीत तोवर मुळशीतील शिवसैनिक भाजपच्या बारामतीतील उमेदवार कांचन कुल यांचा प्रचार करणार नाहीत. अशी भूमिका शिवसैनिकांनी घेतली. याबाबतचं पत्रक देखील शिवसैनिकांनी काढलं आहे.

दरम्यान, भाजपनं थेट शरद पवारांना आव्हान देत बारामती जिंकण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी त्यांनी कांचन कुल यांना उमेदवारी देखील दिली आहे. पण, सध्या 'मुळशी पॅटर्न'मुळे भाजप आता बारामती जिंकणार तरी कशी? असा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवाय, मावळमधील लढतीकडे देखील आता सर्वाचं लक्ष लागून राहिलं आहे.

SPECIAL REPORT: देठ की हो हिरवा; पुण्यात बापट विरूद्ध सुरेखा पुणेकर

First published: March 30, 2019, 9:03 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading