मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

मुक्ताईनगर तालुक्यातील वीरपुत्राला जम्मू कश्मीरमध्ये अपघाती वीरमरण

मुक्ताईनगर तालुक्यातील वीरपुत्राला जम्मू कश्मीरमध्ये अपघाती वीरमरण

जळगावमधील मुक्ताईनगर तालुक्यातील भारतीय सैन्य दलातील जवानाला अपघाती वीरमरण आले आहे.

जळगावमधील मुक्ताईनगर तालुक्यातील भारतीय सैन्य दलातील जवानाला अपघाती वीरमरण आले आहे.

जळगावमधील मुक्ताईनगर तालुक्यातील भारतीय सैन्य दलातील जवानाला अपघाती वीरमरण आले आहे.

  • Published by:  Rahul Punde
जळगाव, 8 ऑगस्ट : गेल्या काही दिवसांपासून देशाचा सीमावर्ती भाग जम्मू कश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या हालचाली वाढल्या आहेत. त्यामुळे भारतीय लष्कराकडून येथे कडक बंदोबस्त करण्यात आला आहे. भारताचा स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट आठ दिवसांवर येऊन ठेपला आहे. स्वातंत्र्यदिनी कुठे घातपात होऊ नये म्हणून लष्कराला अलर्ट देण्यात आला आहे. देशातील अंतर्गत प्रमुख शहरांची सुरक्षा व्यवस्थाही वाढवण्यात आली आहे. दरम्यान, अशा परिस्थितीत एक वाईट बातमी समोर आली आहे. जळगावमधील मुक्ताईनगर तालुक्यातील भारतीय सैन्य दलातील जवानाला अपघाती वीरमरण आले आहे. ही बातमी समजल्यानंतर तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

TET परीक्षेत अपात्र, तरीही अब्दुल सत्तारांच्या मुलीला 2017 पासून 40 हजार पगार, धक्कादायक प्रकार उघड

मुक्ताईनगरच्या जवानाला वीरमरण जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील भारतीय सैन्य दलातील जवानाला अपघाती वीरमरण आले आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडी गावातील वीरपुत्र विपिन जनार्दन खर्चे भारतीय सैन्य दलातील नायब सुभेदार JCO पदावर कार्यरत होते. जम्मू कश्मीर येथील उदमपुरा येथे ड्युटीवरून घरी जाताना मोटरसायकल अपघातात दरीत कोसळून दुःखद निधन झाले आहे. उद्या बुधवारी सकाळी 8.30 वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहे.     या अंत्यविधीला शासकीय आणि लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर ही बातमी घडल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
First published:

पुढील बातम्या