आरक्षणामुळेच ब्राह्मण मुलं परदेशात जातात, पुण्याच्या महापौरांचं वक्तव्य

आरक्षणामुळेच ब्राह्मण मुलं परदेशात जातात, पुण्याच्या महापौरांचं वक्तव्य

आरक्षणामुळेच ब्राह्मण समाजातली मुलं परदेशात नोकरीला जातात असं विधान पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी केलंय.

  • Share this:

29 एप्रिल : आरक्षणामुळेच ब्राह्मण समाजातली मुलं परदेशात नोकरीला जातात असं विधान पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी केलंय.नाशिकच्या ब्राम्हण समाजाच्या कार्यक्रमात त्यांनी हे विधान केलं होतं.

पुण्याच्या महापौर मुक्त टिळक यांनी महापौर झाल्याबद्दल नाशिकला ब्राम्हण महासंघाकडून सत्कार स्वीकारताना धक्कदायक वक्तव्य केलंय. आरक्षणामुळे ब्राम्हण मुलांना संधी नसल्याने ते परदेशी जाताहेत अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केल्याचं माध्यमांनी लिहिलंय. मुक्ता टिळक यांनी मात्र आयबीएन लोकमत शी बोलताना आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला गेल्याच म्हटलंय. तर दुसरीकडे संभाजी ब्रिगेड आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मुक्ता टिळक यांच्या भूमिकेवर विरोधाची भूमिका घेतलीये.

लोकमान्य टिळकांच्या वारस म्हणून पुण्याच्या महापौरपदी बसलेल्या मुक्ता टिळक यांच्या वक्तव्याने एक नवा वाद उभा राहिलाय. नाशिकला पुण्याच्या महापौर झाल्याबद्दल ब्राम्हण महासंघाकडून सत्कार स्वीकारताना आरक्षणामुळे ब्राम्हण मुलांना परदेशांतर करावं लागत असल्याचं धक्कादायक वक्तव्य त्यांनी केलं होतं. माध्यमांमधून त्यांच्या या वक्तव्याच्या बातम्या आल्यानंतर आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला गेल्याच स्पष्टीकरण मुक्ता टिळक यांनी दिलंय तर दुसरीकडे ब्राम्हण महासंघाने टिळक यांच्या या वक्तव्याचं स्वागत केलंय.

मुक्ता टिळक यांच्या वक्तव्यानंतर आता पुरोगामी संघटना प्रचंड आक्रमक झाल्यात. ब्राम्हण मुख्यमंत्री, ब्राम्हण महापौर सर्वांनी स्वीकारल्यानंतर अश्या पद्धतीचं जातीय विद्वेष पसरवणार वक्तव्य महापौरांनी केल्याबद्दल राष्ट्रवादीने आंदोलन केलंय तर संभाजी ब्रिगेडने आत्मक्लेश केलाय..

महापौरांनी पदावर असताना अशी जातीयवादी भूमिका घेतल्याने त्यांच्यावर चहुबाजूने टीका सुरू झालीये.

First published: April 29, 2017, 2:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading