कोरोनापेक्षाही अधिक घातक ठरतोय म्युकरमायकोसीस; साताऱ्यात मृत्यूदर सातपट

कोरोनापेक्षाही अधिक घातक ठरतोय म्युकरमायकोसीस; साताऱ्यात मृत्यूदर सातपट

राज्यात कोरोना विषाणूची दुसरी लाट (Corona virus 2nd Wave) ओसरत असली तरी म्युकरमायकोसीसचा (Mucormycosis) धोका मात्र वाढताना दिसत आहे. त्याचबरोबर म्युकरमायकोसीसचा संसर्ग झालेल्या रुग्णांच्या मृत्यूदरातही (Death rate) वाढ होतं आहे.

  • Share this:

सातारा, 15 जून: राज्यात कोरोना विषाणूची दुसरी लाट (Corona virus 2nd Wave) ओसरत असली तरी म्युकरमायकोसीसचा (Mucormycosis) धोका मात्र वाढताना दिसत आहे. मागील काही काळात म्युकरमायकोसीसचा संसर्ग झालेल्या रुग्णांच्या मृत्यूतही (Death rate) वाढ होतं आहे. त्यामुळे आता कोरोनासोबतच म्युकरमायकोसीसही राज्याची चिंता वाढवताना दिसत आहे.

एकट्या सातारा जिल्ह्यात म्युकरमायकोसीसचा मृत्यूदर 16 टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाची डोकेदुखी वाढत आहे. जिल्ह्यात म्युकरमायकोसीसचा मृत्यूदर कोरोनाच्या मृत्यूदरापेक्षा तब्बल सातपट अधिक असल्याचं समोर आलं आहे. टीव्ही9 ने दिलेल्या वृत्तानुसार, सातारा जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 122 जणांना म्युकरमायकोसिसची लागण झाली आहे. यातील 68 रुग्णांवर सध्या विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. तर म्युकरमायकोसीसमुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या 19 वर जाऊन पोहोचली आहे.

कोरोना विषाणूपेक्षा म्युकरमायकोसीस संसर्गजन्य नसला तरी अधिक घातक आहे. सातारा जिल्ह्यात म्युकरमायकोसीसचा मृत्यूदर 15.57 इतका आहे. हा मृत्यूदर कोरोना विषाणूच्या तुलनेत 6.95 टक्क्यांनी अधिक आहे. म्हणजेच हा दर कोरोनापेक्षा तब्बल सातपट अधिक आहे. अलीकडच्या काळात म्युकरमायकोसीसच्या रुग्णांत सातत्याने वाढ होतं आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये म्युकरमायकोसीसचा अर्थातच ब्लॅक फंगसचा धोका वाढत आहे.

हे ही वाचा-कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटविरोधात अधिक प्रभावी ठरतीये 'ही' लस; मृत्यूदरातही घट

नाकाला ब्लॅक फंगसचा संसर्ग झाल्यानंतर हा संसर्ग डोळ्यापर्यंत पोहोचत आहे. परिणामी मृत्यूचा धोकाही वाढत आहे. त्यामुळे ब्लॅक फंगसचा संसर्ग होताच, नागरिकांनी त्वरित उपचार घेणं गरजेचं आहे. दुसरीकडे देशात म्युकरमायकोसीसचा उपचार घेणंही सामान्य रुग्णांच्या आवाक्याबाहेर जात आहे. कारण एम्फोटेरेसिन बी या इंजेक्शनची किंमत 6 हजारांच्या घरात असून एका रुग्णाला तब्बल 20-20 इंजेक्शन्स द्यावे लागत आहेत. त्यामुळे एम्फोटेरेसिन बी इंजेक्शनच्या किमती कमी कराव्यात अशी मागणी जोर धरत आहे.

Published by: News18 Desk
First published: June 15, 2021, 1:27 PM IST

ताज्या बातम्या