'नाणार'वरून मनसेनं रत्नागिरी पेट्रोकेमिकलचं फोडलं ऑफिस

'नाणार'वरून मनसेनं रत्नागिरी पेट्रोकेमिकलचं फोडलं ऑफिस

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या रविवारच्या भाषणापासून 'स्फुर्ती' घेत मनसेच्या कार्यकर्त्यांनी आज मुंबईतल्या ताडदेव इथं रत्नागिरी पेट्रोकेमिकल लिमिटेडच्या ऑफिसची तोडफोड केली.

  • Share this:

मुंबई,ता.16 एप्रिल: मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या रविवारच्या भाषणापासून 'स्फुर्ती' घेत मनसेच्या कार्यकर्त्यांनी आज मुंबईतल्या ताडदेव इथं रत्नागिरी पेट्रोकेमिकल लिमिटेडच्या ऑफिसची तोडफोड केली.

मनसेचे पाच ते सहा कार्यकर्ते दुपारी साडेतीनच्या सुमार ऑफिसमध्ये आले आणि घोषणाबाजी करत तोडफोड केली. स्वागत कक्ष आणि आणखी एका दालनाची तोडफोड केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी मुलूंडमध्ये घेतलेल्या जाहीर सभेत कुठल्याही परिस्थितीत नाणार प्रकल्प होऊ देणार नाही असं ठणकावून सांगितलं होतं. काय करायचं ते करा पण हा प्रकल्प होऊ देणार नाही असं ते म्हणाले. त्यांच्या या भाषणानंतरच मनसेच्या कार्यकर्त्यांनी ही तोडफोड केली.

 

 

First published: April 16, 2018, 5:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading