Home /News /maharashtra /

वीज कनेक्शन देण्यापूर्वीच वीजबिल पाठवलं घरी; साताऱ्यात महावितरणाचा अजब कारभार

वीज कनेक्शन देण्यापूर्वीच वीजबिल पाठवलं घरी; साताऱ्यात महावितरणाचा अजब कारभार

साताऱ्यातील एका व्यक्तीला वीज कनेक्शन देण्याआधीच महावितरणानं त्यांना वीजबिल (electricity bill) पाठवलं आहे. अस्तित्वात नसलेल्या वीज कनेक्शनसाठी पाठवलेलं हे वीजबिल पाहून संबंधित ग्राहकही हैराण झाले आहेत.

  सातारा, 26 जून: कोरोना काळात (Corona pandemic) राज्यात अनेक ग्राहकांना महावितरणाकडून वाढीव वीजबिलं (Electricity bills) पाठवण्यात आली होती. महावितरणाच्या या अजब कारभारामुळे राज्यात बराच गोंधळ निर्माण झाला होता. हे प्रकरण ताजं असताना महावितरणाच्या अजब कारभाराचं आणखी एक प्रकरण समोर आलं आहे. साताऱ्यातील एका व्यक्तीला वीज कनेक्शन देण्याआधीच महावितरणानं त्यांना वीजबिल पाठवलं आहे. अस्तित्वात नसलेल्या वीज कनेक्शनसाठी पाठवलेलं हे वीजबिल पाहून संबंधित ग्राहकही हैराण झाले आहेत. कैलासराव धुमाळ असं संबंधित व्यक्तीचं नाव असून ते माजी सैनिक आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या शेतीतील कृषीपंपासाठी वीज जोडणीचा अर्ज केला होता. पण महावितरणानं वीज कनेक्शन देण्याऐवजी वीजबिल पाठवलं आहे. महावितरणानं धुमाळ यांना एकूण 1200 रुपयांचं वीजबिल पाठवलं आहे. हे वीजबिल पाहून स्वतः धुमाळ देखील हैराण झाले आहेत. खरंतर, सातारा जिल्ह्यातील वाकेश्वर येथील रहिवासी असणाऱ्या धमाळ यांची भुरकवडी याठिकाणी शेती आहे. या शेतीतील कृषी पंपासाठी त्यांना वीजेची आवश्यकता होती. त्यामुळे त्यांनी 2015 मध्ये वीज जोडणीची मागणी गेली. या जोडणीसाठी महावितरणानं एकूण चार खांबांची मंजुरी दिली होती. या भागात ट्रान्सफॉर्मर बसविल्यानंतर तुम्हाला वीजजोडणी दिली जाईल, असंही महावितरणाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं होतं. हेही वाचा-कांदिवली बनावट लसीकरण प्रकरण; बोगस लस पुरवणाऱ्या डॉक्टर दाम्पत्याला अटक अलीकडेच 2020 मध्ये महावितरणानं ट्रान्सफॉर्मरचं काम केलं आहे. त्यामुळे धुमाळ पुन्हा वीज जोडणीची मागणी करण्यासाठी कार्यालयात गेले. तुम्हाला आठ दिवसांत वीज कनेक्शन दिलं जाईल, असं कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं. पण अद्याप त्यांना वीज जोडणी करून देण्यात आली नाही. याउलट महावितरणानं त्यांना अस्तित्वात नसलेल्या वीज कनेक्शनसाठी 1200 रुपयांचं बिल पाठवून दिलं आहे. हेही वाचा-अखेर CCTV टेक्निशियनचं बिंग फुटलं; Private Video रेकॉर्ड करून करायचा ब्लॅकमेल आश्चर्याची बाब म्हणजे, संबंधित भागातील ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आलं असलं तरी ते अद्याप सुरू करण्यात आलं नाही. या ट्रान्सफॉर्मरचं अद्याप बरंच काम बाकी आहे. अजून कनेक्शनही जोडलेलं नाही, तरीही वीज बिल कसं आलं? असा प्रश्न धुमाळ यांना पडला आहे. याप्रकरणी धुमाळ यांनी लेखी तक्रार दाखल केली आहे. यामध्ये त्यांनी संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची आणि चुकीचं वीजबिल रद्द करण्याची मागणी केली आहे.

  तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Mseb, Satara

  पुढील बातम्या