मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

महावितरणाच्या अभियंत्याला अज्ञातांकडून मारहाण; भांडण सोडवणाऱ्यासाठी गेलेल्या वायरमननं गमावला जीव

महावितरणाच्या अभियंत्याला अज्ञातांकडून मारहाण; भांडण सोडवणाऱ्यासाठी गेलेल्या वायरमननं गमावला जीव

Crime in Jalgaon: सोमवारी जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथील महावितरण (MSEDCL) कंपनीच्या उपकार्यकारी अभियंत्याला अज्ञातांनी मारहाण (People beat engineer) केली आहे. दरम्यान भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या वायरमनचा दुर्दैवी मृत्यू (Wireman Death) झाला आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

भडगाव, 08 जून: सोमवारी जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील भडगाव येथील महावितरण (MSEDCL) कंपनीच्या उपकार्यकारी अभियंत्याला काही अज्ञांतानी मारहाण (People beat engineer) केली आहे. दरम्यान भांडण सोडवण्यासाठी मध्ये गेलेल्या वायरमनचा दुर्दैवी मृत्यू (Wireman Death) झाला आहे. हल्लेखोरांनी भांडण सोडवणाऱ्या वायरमनला धक्काबुक्की केली. झटापटीत संबंधित वायरमन खाली कोसळले. यातच त्यांचा करुण अंत झाला आहे. याप्रकरणी सात अज्ञात तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

संबंधित मृत्यू झालेल्या 48 वर्षीय वायरमनचं नाव गजानन प्रताप राणे असून ते भडगाव येथील बाळद रोडलगत राहतात. सोमवारी दुपारी काहीजणांनी भडगाव चाळीसगाव रस्त्यावर असणाऱ्या वीज वितरण कार्यालयात घुसून उपकार्यकारी अभियंता अजय अशोक धामोरे यांना मारहाण केली आहे. दरम्यान भांडणात पडलेल्या वायरमनचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पीडित उपकार्यकारी अभियंता धामोरे यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.

फिर्यादी धामोरे यांनी तक्रारीत म्हटल्यानुसार, पाचोरा आणि भडगाव याठिकाणी शिवसेनेच्या वतीने सोमवारी वीज वितरण कंपनीच्या दहा कार्यालयांना टाळे ठोकून आंदोलन करण्यात आलं. हे आंदोलन शांततेत पार पडलं. पण सोमवारी दुपारी पावणे एकच्या सुमारास सातजण भडगाव येथील महावितरणाच्या कार्यालयात घुसले. त्यांनी कार्यालयात घुसताच उपकार्यकारी अभियंता अजय अशोक धामोरे यांना मारहाण करायला सुरुवात केली. आपल्या सहकाऱ्याला मारहाण होत असल्याची पाहून महावितरणाचे वरिष्ठ तंत्रज्ञ गजानन राणे भांडण सोडवण्यासाठी पुढे सरसावले.

हे ही वाचा-प्रेयसीची छेड काढल्यानं दिली आयुष्यभराची शिक्षा; दगडाने ठेचून केला खेळ खल्लास

यावेळी अज्ञात युवकांनी गजानन यांनाही मारहाण सुरू केली. या झटापटीत खाली पडल्याने राणे यांचा काही क्षणातच मृत्यू झाला. या घटनेनंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून धूम ठोकली. याप्रकरणी पीडित धामोरे यांनी पोलिसांत अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सातही आरोपी आपल्याला जीवे मारण्याच्या उद्देशाने आले, असल्याचं धामोरे यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. आरोपींनी यावेळी कार्यालयातील काचा, टेबल आणि अन्य वस्तूंची तोडफोडही केली आहे. आरोपींनी कार्यालयाचं एकूण 50 ते 60 हजार रुपयांचं नुकसान केलं आहे.

First published:

Tags: Beating retreat, Crime news, Jalgaon