MSBSHSE, Maharashtra Class HSC/12th Result 2019: रिझल्टच्या दिवशी 'असे' राहा टेन्शन फ्री

MSBSHSE, Maharashtra Class HSC/12th Result 2019: रिझल्टच्या दिवशी 'असे' राहा टेन्शन फ्री

रिझल्टच्या दिवशी काही टिप्स लक्षात ठेवल्यात तर तणाव जाणवणार नाही.

  • Share this:

मुंबई, 28 मे : बारावी परीक्षेचा निकाल आज( 28 मे ) दुपारी 1 वाजता जाहीर  होणार आहे. काही दिवसांनी 10वीचा निकाल लागेल. अनेकदा विद्यार्थी आणि पालक रिझल्टच्या आधी खूप टेन्शन घेतात. विद्यार्थी-विद्यार्थिनी कमी गुण मिळाले किंवा नापास झाले तर आत्महत्याही करतात. पण अनेक मानसोपचार तज्ज्ञ याबद्दल विद्यार्थ्यांचं समुपदेशनही करतात. पण रिझल्टच्या  दिवशी काही टिप्स लक्षात ठेवल्यात तर तणाव जाणवणार नाही.

HSC Result : इथे चेक करा तुमचा निकाल फक्त एका क्लिकवर

तज्ज्ञ सांगतात, महत्त्वाचं म्हणजे तुम्ही परीक्षा देऊन झालीय. पेपरमध्ये जे लिहिलंय, ते बदलता येणार नाही. दहावी, बारावीची परीक्षा हा एवढ्या मोठ्या आयुष्याचा भाग असतो. आयुष्य नव्हे. आयुष्य अनेक चांगल्या-वाईट घटनांनी घडत असतं. परीक्षेतले मार्क हे काही तुमचं अख्खं आयुष्य नाही.

HSC Result : मोठी बातमी! बारावीच्या निकालाची तारीख जाहीर

रिझल्टच्या दिवशी विद्यार्थ्यांनी आनंदात रहावं. आपण ज्यामुळे खूश होतो, त्या गोष्टी कराव्यात. आवडती गाणी ऐकणं, सिनेमा पाहणं, गेम्स खेळणं, मित्र-मैत्रिणींबरोबर मोकळ्या हवेत फिरायला जाणं या गोष्टी कराव्यात. आवडते पदार्थही खावेत. ज्यांना योग, मेडिटेशन करायची सवय आहे, तेही करावं.

मानसोपचारांनी पालकांसाठीही काही गोष्टी सांगितल्यात. रिझल्टच्या दिवशी पालकांनी घरात खेळीमेळीचं वातावरण ठेवावं. पुन्हा पुन्हा रिझल्ट या विषयावर बोलू नये. महत्त्वाचं म्हणजे निकाल काही लागला तरी आम्हाला काही फरक पडत नाही, हा दिलासा पाल्याला द्यावा.

55 रुपये जमा केलेत तर मिळेल दर महिन्याला 3 हजार रुपये पेन्शन, असं करा रजिस्ट्रेशन

अनेकदा कमी मार्क मिळाले तर अ‍ॅडमिशन कशी मिळणार हे टेन्शन असतं. पण हल्ली करियरची क्षेत्र वाढलीयत. संधीही भरपूर उपलब्ध आहेत. मार्कांप्रमाणे कुठल्याही क्षेत्रात अ‍ॅडमिशन घेता येईल, हे पालक आणि मुलांनीही लक्षात ठेवावं.

VIDEO: नीलम गोऱ्हे यांनी खासदार इम्तियाज जलील यांना काय दिलं आव्हान?

First published: May 28, 2019, 8:32 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading