HSC Result 2019, Maharashtra Board: 12 वीच्या निकालानंतर गोंधळून जाऊ नका, असं निवडा तुमचं करिअर

HSC Result 2019, Maharashtra Board: 12 वीच्या निकालानंतर गोंधळून जाऊ नका, असं निवडा तुमचं करिअर

बारावी हा करिअरच्या मार्गावरचा महत्त्वाचा टप्पा. खऱ्या अर्थाने पुढच्या आयुष्याची दिशा या निकालानंतर ठरते.

  • Share this:

मुंबई, 28 मे : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 20 मार्च या काळात घेतली होती. त्याचा निकाल आज जाहीर होणार आहे. बारावी हा करिअरच्या मार्गावरचा महत्त्वाचा टप्पा. खऱ्या अर्थाने पुढच्या आयुष्याची दिशा या निकालानंतर ठरते. कारण कुठल्या क्षेत्रात करिअर करायचं हा महत्त्वाचा निर्णय या टप्प्यावर घ्यावा लागतो.

माजी आयएएस अधिकारी आणि करिअर मार्गदर्शक अविनाश धर्माधिकारी सांगतात, "तुम्हाला ज्या क्षेत्रात करिअर करायचं आहे त्या क्षेत्रात उत्तमतेचा ध्यास घेतला तर तुम्हाला यश नक्कीच मिळेल. इंजिनिअरिंग, मेडिकल अशा चाकोरीच्या वाटा सोडून वेगळ्या क्षेत्रातल्या संधी निवडण्याचं धाडस तुम्ही दाखवायला हवं."

HSC Result : इथे चेक करा तुमचा निकाल फक्त एका क्लिकवर

बारावीत कमी मार्क मिळाले तर...

तुम्ही विज्ञान, गणित या विषयांत हुशार असलात तरच हुशार आणि एखाद्या कलेत प्रवीण असाल तर मात्र हुशार नाही, हा समजच चुकीचा आहे, असं अविनाश धर्माधिकारी म्हणतात. पुस्तकी बुद्धिमत्ता म्हणजेच फक्त हुशारी, असं नव्हे. दहावी - बारावीला मेरिटमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रचंड कौतुक होतं. पण हेच विद्यार्थी पुढच्या 20- 25 वर्षांनी कुठे आहेत हे तुम्हाला माहीत असतं का? याउलट जीवनाच्या कुठल्याही क्षेत्रात यशस्वी झालेल्या एखाद्या व्यक्तीला तुम्ही विचारून बघा. तुम्हाला दहावी, बारावीमध्ये किती मार्क मिळाले होते... काय असेल त्यांचं उत्तर? त्यांच्या या उत्तरातून तुम्हाला जीवनात यशस्वी होण्याचे धडे मिळतील, असं धर्माधिकारी सांगतात.

VIDEO : दहावी-बारावीनंतर पुढे काय? कसं निवडाल करिअर? सांगत आहेत अविनाश धर्माधिकारी (भाग - १ )

वेगळ्या क्षेत्रांत कसं मिळवाल यश ? सांगत आहेत अविनाश धर्माधिकारी (भाग - 2)

VIDEO करिअर मंत्र : जीवनात यशस्वी कसं व्हाल ? सांगत आहेत अविनाश धर्माधिकारी (भाग - 3)

बारावीचा निकाल ऑनलाईन कसा पाहाल निकाल?

बारावीचा निकाल : News18Lokmat च्या वेबसाईटवर बघायला मिळेल ऑनलाईन निकाल

महाराष्ट्र बोर्डाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी (दिनांक 28 मे)लागणार आहे. दुपारी 1 वाजता हा HSC result जाहीर होईल आणि तो विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येईल. HSC बोर्डाच्या

mahresult.nic.in या वेबसाईटवर दुपारी 1 वाजल्यानंतर निकाल पाहू शकाल. याशिवाय News18 Lokmat च्या वेबसाईटवरही निकाल पाहता येईल.

विद्यार्थ्यांनी परीक्षा प्रवेशपत्रावर म्हणजेच अॅडमिट कार्डवर असलेला त्यांचा रोल नंबर किंवा परीक्षा क्रमांक टाकल्यानंतर हा निकाल पाहता येणार आहे. याशिवाय दिलेल्या फॉरमॅटमध्ये जन्मतारीखसुद्धा टाकावी लागणार आहे. हे दोन्ही रकाने भरल्यानंतर विद्यार्थ्यांना निकाल पाहायला मिळेल.

महाराष्ट्र बोर्डाच्या सर्व विभागांनी घेतलेल्या परीक्षेचे निकाल या एकाच ठिकाणी पाहायची सोय आहे. बरोबर दुपारी एक वाजता आमच्या वेबसाईटवर निकालाची लिंक ओपन होईल. त्यावर क्लिक केल्यावर निकाल कळेल.

VIDEO : पार्थ पवार यांच्या पराभवाबद्दल पहिल्यांदाच बोलल्या सुप्रिया सुळे

First Published: May 28, 2019 01:22 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading