कोरम मॉलमध्ये एमएस धोनीचे जगातील सर्वात मोठे मोझेक पोर्टेट

कोरम मॉलमध्ये एमएस धोनीचे जगातील सर्वात मोठे मोझेक पोर्टेट

भारतीय क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी याचा येत्या सात जुलैला 38 वा वाढदिवस आहे. या पार्श्वभूमीवर ठाण्यातील कोरम मॉलमध्ये धोनीचे जगातील सर्वात मोठे चेस मोझेक पोर्टेट साकारण्यात आले.

  • Share this:

ठाणे, 5 जुलै- भारतीय क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी याचा येत्या सात जुलैला 38 वा वाढदिवस आहे. या पार्श्वभूमीवर ठाण्यातील कोरम मॉलमध्ये धोनीचे जगातील सर्वात मोठे चेस मोझेक पोर्टेट साकारण्यात आले. धोनीचे हे पोर्ट्रेट थ्रीडी आर्टिस्ट आबासाहेब शेवाळे या प्रतिभाशाली कलाकाराने बनवले आहे.

पोर्ट्रेटची साईज 20 फूट बाय 20 फूट असून त्यासाठी 1,41,000 चेसच्या प्यादांचा वापर करण्यात आला. ते पूर्ण झाल्यावर गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसाठी पात्र असेल, अशी माहिती आबासाहेब शेवाळे यांनी दिली आहे. शेवाळे त्यांनी पूर्वी अमिताभ बच्चन आणि विराट कोहली यांचे मोझेक पोर्टेड तयार केले होते. एमएस धोनी याचे पोर्ट्रेट अशा परिपूर्णतेने तयार केले गेले की, ते पाहाणाऱ्याला खरेच वाटते. मॉलच्या लॉबीमध्ये तयार करण्यात आलेले पोर्टेड पाहाण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती.

कल्पतरू रिटेल लिमिटेडचे हेड रिटेल सुरेंदर पाल यांना सांगितले की,'कोरम मॉल सर्व प्रकारच्या कलांना प्रोत्साहन देण्यात विश्वास ठेवतो. ही खरोखर एक अद्वितीय निर्मिती आहे. प्रसिद्ध कलाकार आबासाहेब शेवाळे यांच्या द्वारे बनविण्यात आलेला एमएस धोनीचा हा रेकॉर्ड ब्रेकिंग पोर्टे होस्ट करण्यासाठी आम्ही उत्साहीत झालो आहोत.

75 हजार CDचा वापर करून या तरुणाने साकारली होता शिवप्रतिमा

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून 1 मे रोजी सुमारे 75 हजार गाण्यांच्या सीडीजचा वापर करुन छत्रपती शिवाजी महारांची प्रतिकृती साकारण्यात आली होती. चेतन राऊत असे या तरुणाचे नाव असून त्याने मुंबईतील विक्रोळीमध्ये महाराजांची ही प्रतिकृती साकारली होती. या प्रतिकृतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. विक्रोळी येथील धर्मवीर संभाजी मैदानात चेतन विश्वविक्रमी मोझेक पोर्टेट साकारले होते. 75 हजार सिडीज, 110 बाय 90 फूट असे ते पोर्टेट असून ब्राझील येथील क्रिस्ट ऑफ रेडीमेर पुतळ्याच्या उंचीशी साधर्म्य साधणारे होते. ही प्रतिकृती पूर्ण व्हायला चेतनला तब्बल 48 तास लागले.

VIDEO: ...म्हणून जितेंद्र आव्हाडांनी या पोलिसांकडे सोपवले खेकडे

First published: July 5, 2019, 5:42 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading