PM मोदींच्या वाढदिवसाला मिसेस मुख्यमंत्र्यांचं ट्वीट चर्चेत, मोदींना म्हणाल्या 'राष्ट्रपिता'

अमृता फडणवीस यांनी पंतप्रधानांना शुभेच्छा देण्यासाठी एक Tweet केलं. या ट्वीटमुळे नव्या चर्चेला तोंड फुटलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 17, 2019 07:31 PM IST

PM मोदींच्या वाढदिवसाला मिसेस मुख्यमंत्र्यांचं ट्वीट चर्चेत, मोदींना म्हणाल्या 'राष्ट्रपिता'

मुंबई, 17 सप्टेंब : मुख्यमंत्र्यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 69 व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. त्यांनी पंतप्रधानांना शुभेच्छा देण्यासाठी एक Tweet केलं. त्यामध्ये त्यांनी पंतप्रधानांना father of Country म्हटल्यामुळे चर्चेला तोंड फुटलं आहे. फादर ऑफ नेशन म्हणजे राष्ट्रपिता असं महात्मा गांधींना उद्देशून म्हणायची पद्धत आहे. आता त्याच धर्तीचं नवं बिरुद मिसेस मुख्यमंत्र्यांनी मोदींना लावल्यामुळे ट्विटरवर विविध प्रतिक्रिया उमटल्या. समाजाच्या कल्याणासाठी निरंतर सेवा करण्याची प्रेरणा देणाऱ्या देशाच्या पित्याला (राष्ट्रपिता) वाढदिवसाच्या शुभेच्छा असं त्यांच्या ट्वीटचं भाषांतर होऊ शकतं.

मूळ ट्वीट काय आहे ते पाहा -

Loading...

या ट्वीटबरोबर अमृता फडणवीस यांनी स्वतः एका कार्यक्रमात गायलेल्या गाण्याची पोस्टही केली आहे.

हेही वाचा - PM मोदींच्या वाढदिवसाला मंत्र्याचे आक्षेपार्ह ट्वीट, पाकच्या नागरिकांनीही सुनावलं

'मिट्टी के सितारे' या शोच्या 'ओ रे मनवा तू तो बावरा है तू ही जाने तू क्या सोचता है' हे गाणं अमृता यांनी सादर केलं होतं. या गाण्याचा व्हिडिओ त्यांनी शुभेच्छा देताना पोस्ट केला आहे.

-------------------------------------------------------

VIDEO: पंतप्रधान मोदींच्या हस्ते फुलपाखरू उद्यानाचं उद्घाटन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 17, 2019 07:31 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...