मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

MPSC: तहसीलदार म्हणून निवड झाली, सध्या शेतमजूर म्हणून काम करतोय, नियुक्ती कधी? तरुणाचा कळकळीचा प्रश्न

MPSC: तहसीलदार म्हणून निवड झाली, सध्या शेतमजूर म्हणून काम करतोय, नियुक्ती कधी? तरुणाचा कळकळीचा प्रश्न

प्रविण कोटकर नावाच्या तरुणानं ट्वीट (Tweet) केलं आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं, की MPSC मधून माझी तहसीलदार म्हणून निवड झाली. ही निवड होऊन आता दहा महिने झाले.

  • Published by:  Kiran Pharate

मुंबई 12 मार्च: एमपीएससीने (MPSC State Service Prelims) परीक्षेबाबत गुरुवारी महत्त्वाची घोषणा केली आहे. यावर्षी 14 मार्च रोजी होणारी एमपीएससीची परीक्षा पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. या परीक्षेची तारीख गेल्या दीड वर्षात पाचव्यांदा पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे परीक्षार्थी नाराज आहेत. अनेक परीक्षार्थी याच कारणामुळे गुरुवारी रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं. अशात आता एका तरुणानं केलेलं ट्वीट नियुक्तीबाबतही प्रश्न उपस्थित करणार आहे.

प्रविण कोटकर नावाच्या तरुणानं हे ट्वीट (Tweet) केलं आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं, की MPSC मधून माझी तहसीलदार म्हणून निवड झाली. ही निवड होऊन आता दहा महिने झाले. मात्र, सरकारनं अद्यापही नियुक्ती दिलेली नाही. सध्या शेतमजूर म्हणून काम करतोय. लोकं आम्हाला हसतात आणि सरकारला शिव्या देतात, असं म्हणत नियुक्ती कधी? असा प्रश्नही प्रविण यांनी उपस्थित केला आहे. हे ट्वीट करत त्यांनी सरकारला थेट जाब विचारला आहे.

परीक्षा पुढे ढकलल्यानं परीक्षार्थी संतप्त -

आधी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आणि त्यानंतर कोरोना साथीचं (Coronavirus Pandemic) कारण देत एमपीएससीची परीक्षा अनिश्चित काळासाठी लांबणीवर गेली. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. गुरुवारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने याबाबत प्रसिद्धीपत्रक जारी करत माहिती दिली आहे. राज्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. परिणामी अनेक जिल्ह्यात निर्बंध लागू करण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर ही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे. ही परीक्षा कधी होणार याबाबत लवकरच तारीख जारी केली जाईल, असंही यात म्हटलं आहे.

First published:

Tags: Mpsc examination, Tweet