जालना, 06 ऑगस्ट: एमपीएससी परीक्षेची (MPSC Exam) तयारी करणाऱ्या एका विद्यार्थ्यावर (Student Death) काळानं घाला घातला आहे. अचानक आलेल्या हृदयविकाराच्या झटक्यामुळं (Heart Attack) त्याचं पीएसआय बनण्याचं स्वप्न (dream of becoming PSI) अधुरंच राहिलं आहे. वडिलांना शेतात मदत करणाऱ्या गेलेल्या मुलाला अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना समोर येताच गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
अशोक सोनाजी घुले असं हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झालेल्या 30 वर्षीय विद्यार्थ्याचं नाव आहे. मृत अशोक हा जालना जिल्ह्यातील आंबा येथील रहिवासी आहे. मागील दोन वर्षांपासून तो औरंगाबाद याठिकाणी राहून एमपीएससी परीक्षेची तयारी करत होता. दरम्यान लॉकडाऊन असल्यानं तो पुन्हा घरी आला होता.
हेही वाचा- गावातल्या जिद्दी मुलीची कहाणी; IAS अंकिता चौधरींनी अडथळ्यांवर मात करत मिळवलं यश
मृत अशोक बुधवारी दुपारी आपल्या वडिलांना शेतीकामात मदत करण्यासाठी शेतात गेला होता. शेतात गेल्यानंतर त्यानं काही वेळ वडिलांसोबत काम केलं. पण सायंकाळी चारच्या वाजेच्या सुमारास अशोकला अस्वस्थ वाटू लागलं, तसेच त्याच्या छातीत दुखायला सुरुवात झाली. पुढच्या काही मिनिटांतच अशोकला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि यातचं त्याचं निधन झालं. एका क्षणात होत्याचं नव्हतं झाल्यानं गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा-भारतीय विद्यार्थ्याची चीनमध्ये निर्घृण हत्या, सडलेल्या मृतदेहाचा वास सुटल्याने झाला खुनाचा उलगडा
मृत अशोक हा मागील दोन वर्षांपासून औरंगाबाद याठिकाणी राहून स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. पीएसआय बनण्याचं त्याचं स्वप्न होतं. परंतु गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही एमपीएससीची परीक्षा रद्द होते की काय? याबाबत अशोक चिंताग्रस्त होता. अशातच शेतात गेल्यानंतर अशोकवर काळानं घाला घातला आहे. त्यामुळे त्याचं पीएसआय होण्याचं स्वप्न अधुरंच राहिलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Death, Mpsc examination, Student