भंगार गोळा करून रांगोळी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्याचा मुलगा बनला नायब तहसीलदार

भंगार गोळा करून रांगोळी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्याचा मुलगा बनला नायब तहसीलदार

अक्षयनं स्वप्नाला आपल्या परिश्रमाची जोड देवून आज वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी राज्यसेवा परीक्षा उत्तीर्ण करत तो नायब तहसीलदर बनला आहे.

  • Share this:

अमरावती, 22 जून: घरची परिस्थिती जेमतेम.. झोपडी वजा घर.. कुटुंबाचं हातावर पोट असताना त्यानं झोपडीतच अभ्यासाचा दिवा पेटवून राज्यसेवा परीक्षा उत्तीर्ण करत आपल्या झोपडीसह समाजाला प्रकाशमान केलं आहे. अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथील अक्षय बाबाराव गडलिंग ही नायब तहसिलदार झाला आहे. अक्षयनं गरिबीचं भांडवल न करता जिद्द आणि परिश्रमाच्या जोरावर यशोशिखर गाठलं आहे. अक्षयचे वडील बाबाराव गडलिंग हे गेल्या 40 वर्षांपासून भंगार गोळा करून रांगोळी विक्रीचा व्यवसाय करत आहे.

हेही वाचा... मटका व्यावसायिकाचा मुलगा बनला नायब तहसीलदार, मृत वडिलांचं स्वप्न केलं पूर्ण!

अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथील अक्षय बाबाराव गडलिंग हा स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा गरीब विद्यार्थी. जिद्द व चिकाटीच्या जोरावर अधिकारी बनला आहे. अक्षय हा लहानपणापासूनच अत्यंत हुशार आहे. त्याने वादविवाद स्पर्धा, वत्कृत्व स्पर्धेत या आधीही आपली चमक दाखवली आहे. परंतु वेगळं काहीतरी करण्याची जिद्द असलेल्या अक्षयने प्रशासकीय अधिकारी होण्याचा निर्धार केला होता.

परिस्थिती अत्यंत बेताची असताना अक्षयचे वडील बाबाराव गडलिंग हे गेल्या 40 वर्षांपासून भंगार व रांगोळी विक्रीचा व्यवसाय करत आहे. या व्यवसायावरच ते संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. गरीबीची चणचण अक्षयला भासू नये, यासाठी वडिलांनी अक्षयला अभ्यासासाठी कुठलीच कमतरता होऊ दिली नाही. धेय्यवेड्या अक्षयने अधिकारी होण्याचे स्वप्न उराळी बाळगलं आणि ते सत्यात उतरवलं आहे. अक्षयनं स्वप्नाला आपल्या परिश्रमाची जोड देवून आज वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी राज्यसेवा परीक्षा उत्तीर्ण करत तो नायब तहसीलदर बनला आहे.

आपल्या गरीबीचं भांडवल न करता अक्षयने वाचनालयात बसून अभ्यास केला. आज अक्षयच्या जिद्द, चिकाटी व परिश्रमासमोर गरीबीला देखील झुकावं लागलं आहे. अक्षयच्या यशाने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर आदर्श उभा केला आहे. अक्षयने शाळेच्या वाद-विवाद स्पर्धा, वकृत्व स्पर्धा व इतर स्पर्धेत भाग घेऊन प्रथम क्रमांकाचे पारितोषिक सुद्धा पटकावलं आहे.

हेही वाचा...जिद्दीला सॅल्युट! शेतकऱ्यांची लेक बनली तहसीलदार, जावई सीमेवर करतोय देश सेवा

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत त्याने आधी पीएसआय, वनविभागाची परीक्षा देखील पास केली होती. मात्र, काही कारणास्तव तो जाऊ शकला नाही. मात्र अभ्यास सुरू ठेवत त्यानं आज राज्यसेवा परीक्षा उत्तीर्ण होऊन समाजापुढे एक नवा आदर्श निर्माण केला आहे. अक्षयला अमरावती येथील चाणक्य फाऊंडेशनचे मिलिंद लाहे यांनी मार्गदर्शन केलं.

First published: June 22, 2020, 3:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading